अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील मुडी प्र.अ.दरेंगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मगन नथु गोलाईत तर उपसरपंचपदी रमेश जगन भिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन.आर.कऱ्हाडे होते तर नवनिर्वाचित सदस्य सौ.विजयाबाई राजाराम पाटील, सौ.भिकुबाई बापू भिल तसेच सौ.मनीषा सतीश पाटील, जितेंद्र मिठाराम पाटील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान सदर ग्रा.पं.च्या निवडणुकीत पॅनल प्रमुख राजाराम एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनलने वर्चस्व निर्माण केले होते. या पॅनलला बाळासाहेब छबिलाल पाटील (नाशिक), बळीराम शामराव पाटील, राजेंद्र शामराव पाटील, राजू नामदेव पाटील, धोंडू संतोष पाटील, श्रीराम पुंडलिक पाटील, दगडू नामदेव पाटील, दिनकर देवचंद पाटील, गोकुळ कोंडू पाटील, एकनाथ पंडित पाटील, दिलीप छबिलाल पाटील, मच्छिंद्र काशीराम पाटील, संदीप कैलास पाटील, रवींद्र महारु पाटील, जिजाब शांताराम पाटील, नाना तानकु पाटील, योगेश देविदास पाटील, कैलास डिगंबर पाटील, अमोल भरतसिंग शिंदे, बापू रावण भिल, रामकृष्ण नामदेव पाटील, जगन दोधू भिल आदींसह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. सदर ग्रा.पं.वर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व झाले असून आ.अनिल पाटील यांनी नूतन सरपंच उपसरपंच यांचे अभिनंदन केले आहे.