खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

पालिकेच्या विषय समितीवर विनोद लांबोळे, सुरेश पाटील, राजेश पाटील, प्रा.पाटील यांची पुन्हा वर्णी

अमळनेर (प्रतिनिधी) येथील नगरपालिकेच्या नियोजन समितीच्या सभापतिपदी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे यांची तर बांधकाम सभापती सुरेश पाटील, पाणीपुरवठा सभापती राजेश पाटील व शिक्षण सभापतीपदी प्रा. कुमार रामकृष्ण पाटील यांची पुनश्च निवड करण्यात आली.
नगरपालिकेच्या विषय समिती सभापती निवड पिठासन अधिकारी तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी  महिला बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या संगीता संजय पाटील तर आरोग्य सभापतिपदी घनश्याम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड बिनविरोध करण्यासाठी माजी आमदार साहेबराव पाटील , नगराध्यक्ष पुष्पलता पाटील , मनोज पाटील , विवेक पाटील , विरोधी पक्ष गटनेते प्रवीण पाठक , सलीम शेख , नूतन महेश पाटील ,प्रताप शिंपी यांचे सहकार्य लाभले. पिठासन अधिकारी मिलिंद वाघ याना मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड , उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड , संजय चौधरी , सभा लिपिक महेश जोशी यांचे सहकार्य लाभले.

राजेश पाटील यांची सलग पाचव्यांदा पाणी पुरवठा सभापती निवड झाल्याने कौतुक

शहरात गेल्या पाच वर्षांपासून नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याचे उत्कृष्ट नियोजन करणारे आणि नुकत्याच पैलाड भागात पाईपलाईन फुटूनही १२ तासाच्या आत पाणीपुरवठा पूर्वरत करणारे  नगरसेवक राजेश पाटील यांची सलग पाचव्यांदा पाणी पुरवठा सभापती निवड झाल्याने त्यांचे कौतुक होत. खरे तर त्यांच्या उत्कृष्ट नियोजन आणि पाणीपुरवठा  अधिकाऱ्यांवर असलेल्या पकडमुळे शहरातील पाण्याची समस्या सोडण्यास मोलाची भूमिका आहे. म्हणून त्यांची सलग पाचव्यांदा पाणी पुरवठा सभापतीपदी वर्णी लागली आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button