खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

नगरपरिषद सभागृहास महात्मा फुले नामांतर ठरावाची अंमलबजावणी करा

राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त स्वाक्षरी मोहिमेस केला प्रारंभ

अमळनेर (प्रतिनिधी)  न.पा. सभागृहास क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले सभागृह असे नामांतराचा ठराव सर्व साधारण सभेत करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी त्वरित व्हावी व फुले दांपत्य यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी क्रांतिसूर्य महात्मा फुलें विचारमंचतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त करण्यात आली असून यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यास राजमाता जिजाऊ जयंतीला प्रारंभ  करण्यात आला आहे.
मुख्याधिकारी विद्या गायकवाड व जिजामाता कृषी भूषण नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांना निवेदन देऊन महात्मा फुले विचारमंच चे संस्थापक प्रवीण महाजन यांनी पदाधिकाऱ्यांसह मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांच्याशी ठरावा बाबत चर्चा केली. निवेदनावार जिल्हाध्यक्ष प्रा.नितीन चव्हाण जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र महाजन, जिल्हाकार्यध्यक्ष विजय माळी, सचिव अनिता महाजन जिल्हाउपाध्यक्ष रवींद्र बोरसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button