खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

कॉटन जिनर्सचा संप आणि मकरसंक्रांतीमुळे कापूस खरेदी चार दिवस बंद

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र कॉटन जिनर्स असोसिएशनचा संप आणि मकरसंक्रांतीच्या सणामुळे शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद राहणार असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर हे चार दिवस संक्रांत ओढवणार आहे.  
महाराष्ट्र कॉटन जिनर्स असोसिएशनद्वारे राज्यात दि.११ जानेवारी व  १२ जानेवारी रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. तसेच दि.१४  जानेवारी रोजी मकरसंक्रांत हा सण असल्याने महासंघाची राज्यातील सर्व केन्द्रावरील कापूस खरेदी या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली. कापूस खरेदी बंद असल्याबद्दल  बाबत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीला कळवण्यात आले असून या कालावधीत शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणू नये. जेणेकरून कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button