कापूस खरेदीचा भाव कमी केल्याने शेतकरी आणि ग्रेडरमध्ये उद्भभवला जोरदार राडा

सोमवारपासून ५६१० रुपये प्रतिक्विंटल मिळणार भाव, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

अमळनेर (प्रतिनिधी) कापूस पणन महासंघाने कापूस खरेदीचा भाव कमी करून तो ५६१० केल्याने मोजमापसाठी दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी जोरदार राडा राडा केला. त्यात शेतकरी आणि ग्रेडर अनिल कदम यांच्यामध्ये  शाब्दिक वादाच्या चांगल्याच फैरी झडल्या. वाद मिटवून शुक्रवारी अखेर जुन्या ५७२५ भावातच मोजणी करण्यात आली. तर सोमवारपासून ५६१० प्रतिक्विंटल भावाने कापूस पणन महासंघ खरेदी करणार असल्याची माहिती देखील ग्रेडर अनिल कदम यांनी दिली आहे. भाव पडल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली.
नेहमीप्रमाणे नोंदणी केलेल्या नंबरनुसार वाहने मोजणीसाठी लामा जिनिंगमध्ये वाहने लागली होती. यावेळी प्रतवारी करतांना कापसाचा भाव ५६१० लावण्यात आला. दरम्यान ही माहिती तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. सुभाष पाटील यांना माहिती प्राप्त झाली. त्यांचेही वाहन मोजणीसाठी रांगेत उभे होते. गुरुवारी दोन वाहने मोजली गेली होती. त्यातील एक वाहन बाकी होते त्यांना ही माहिती कळताच त्यांनी लामा जिनिंगमध्ये जाऊन याबाबत जाब विचारला मात्र ग्रेडरने कापूस पणन महासंघाने भाव कमी केल्याचे सांगताच शेतकऱ्यांनी मोजणी बंद केली. व फलक का लावला नाही यासाठी मोजणी बंद  आंदोलन केले याबाबत प्रा सुभाष पाटील यांनी पणन संचालक संजय पवार यांच्याशी देखील संपर्क साधला त्यानंतर त्यांनी आमदार अनिल पाटील यांच्याशी देखील चर्चा केली.  त्यांनी याबाबत वरीष्ठ पातळीवर देखील चर्चा केली अखेर १ जानेवारी रोजी दाखल झालेला कापूस मोजमाप करावा असे ठरले शनिवारी आणि रविवारी सुट्या असल्याने मोजणी बंद राहणार आहे. सोमवारपासून कापसाला कलर ग्रेड येत असल्याने त्या कलर ग्रेड भावानुसार ही खरेदी केली जाईल  पणन महासंघ सीसीआयचे एजंट म्हणून २ टक्के कमिशनने ही खरेदी करत आहे जिल्ह्यात सर्व सीसीआयच्या केंद्रांवर ५६१५ भावाप्रमाणे खरेदी केला जात असून सोमवार पासून ५६१५ या दराने खरेदी केली जाईल असे ग्रेडर अनिल पवार यांनी सांगितले तसा फलक देखील लावण्यात येईल असे सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *