❤️सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी झाल्यास गामसेवक हा हंगामी सरपंच असतो.
❤️ग्रामपंचायतीची रचना व कार्ये 1963 च्या कायद्याने नियंत्रित होतात.
❤️न्यायपंचायतीचा कार्यकाल सर्वसाधारणपणे 3 ते 5 वर्षे एवढा असतो.
❤️सरपंच व उपसरपंच यांना न्यायपंचायतीचे सभासद होता येत नाही.
❤️न्यायपंचायत 100 रु. किंमतीचे दिवाणी दावे चालविते.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
❤️महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत – अकलूज.
❤️महाराष्ट्रीतील सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत – नवघर.
❤️महाराष्ट्रातील सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सातारा.
❤️महाराष्ट्रात सर्वात कमी ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सिंधुदुर्ग.
❤️ग्रामपंचायतीचे वॉर्ड निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्यास असतो.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
❤️जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीनुसार राज्यशासन ग्रामपंचायतीचा कार्यकाल 6 महीने वाढवू शकते.
❤️ग्रामपंचायतीच्या बैठका महिन्यापासून एक म्हणजेच वर्षातून 12 बोलवाव्या लागतात.
❤️ग्रामपंचायतीच्या पंचास व उपसरपंचास सरपंचाकडे राजीनामा द्यावा लागतो तर सरपंच पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देतो.
❤️सरपंचावर अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी एकूण सदस्याच्या 1/3 सदस्यांनी लेखी मागणी करावी लागते तर तो ठराव पास होण्यासाठी एकूण सदस्यांच्या 2/3 सदस्यांनी तो ठराव पास करावा लागतो.
❤️महिला सरपंचावर अविश्वास ठराव पास होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते.
❤️एकदा अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास दुसरा अविश्वास ठराव कमीत कमी 1 वर्षे आणता येत नाही.
❤️सरपंच किंवा उपसरपंच यांच्या निवडीबाबत काही विवाद निर्माण झाल्यास 15 दिवसाच्या आत सदरहू विवाद जिल्हाधिकार्याकडे सोपविता येतो.
❤️ तसेच जिल्हाधिकार्याने दिलेल्या निर्णयावर निर्णय दिलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे अपिल करता येते.
❤️सरपंच किंवा उपसरपंचावरील अविश्वासाच्या ठरावाची बैठक तहसीलदार बोलावितो व तोच त्या बैठकीचा अध्यक्ष असतो.
❤️सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो.
❤️ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनास आहे.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
: ❤️जर एखाद्या ग्रामपंचायतीमधील एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक पदे रिक्त असतील तर राज्यशास्त्र ग्रामपंचायत बरखास्त करू शकते.
❤️सरपंच, उपसरपंच व पंचास अकार्यक्षता, गैरवर्तन, कर्तव्य पार पाडण्यास असमर्थता इत्यादी कारणाने पदावरून दूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस आहे.
❤️नवीन ग्रामपंचायत निर्माण करण्याचा अधिकार विभागीय आयुक्ताला असतो.
❤️ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा कमी आहे. अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी जिल्हा परिषद करते आणि ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा जास्त आहे अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी लेखापाल, स्थानिक लोकनिधी मार्फत होते.
❤️ज्या खेड्यातील अनुसूचीत जाती-जमातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 60% पेक्षा जास्त असते अशा गावातील सरपंच हा अनुसूचित जाती जमातीमधील असतो.
❤️ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा दरमहा मानधन लोकसंख्येनुसार 750, 1125 व 1500 रु. मिळते, या मानधनाच्या 75% रक्कम राज्यशासन देते.
❤️ग्रामपंचायतीच्या सदस्यांना दरमहा 200 रु. बैठक भत्ता मिळतो.
❤️ग्रामपंचयातीमध्ये एकूण 79 विषय आहेत.
❤️सरपंच किंवा उपसरपंचाविरुद्ध अविश्वासाची नोटिस तहसीलदारकडे द्यावी लागते.
❤️जिल्हाधिकार्यास ग्रामपंचायतीचा ठराव रोखण्याचा अधिकार असतो.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
: ❤️ग्रामपंचायतीमध्ये महिलासाठी 50% जागा राखीव असतात.
❤️ग्रामपंचायतीमध्ये इतर मागासवर्गीयासाठी 27% जागा राखीव असतात.
❤️ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातीच्या लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात ही संख्या निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्याला असतो.
❤️संबंधीत गावातील सहकारी सोसायटीचा अध्यक्ष ग्रामपंचायतीचा सहयोगी सभासद असतो.
❤️महाराष्ट्रात 1 जून 1959 पासून ‘मुंबई ग्रामपंचायत अधिनियम’ लागू करण्यात आला.
❤️ग्रामपंचायतीचा अध्यक्ष हा सरपंच असतो.
❤️सरपंचाची निवड निवडून आलेल्या सदस्यामधून केली जाते तसेच त्यातूनच एकाची उपसरपंच म्हणून निवड केली जाते.
❤️सरपंच व उपसरपंच निवडीची बैठक तहसीलदार बोलवितो व तोच त्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवितो.
❤️ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले असावे लागते.
❤️ग्रामपंचायतीची निवडणूक दर 5 वर्षांनी होते म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कालावधी 5 वर्षाचा असतो.
❤️ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्यास अनामत रक्कम – 500 रु. राखीव जागेसाठी – 100 रु.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
: ????महराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या पंचाची संख्या लोकसंख्येवरून ठरविण्यात येते ती खालीलप्रमाणे :
❤️लोकसंख्या – पंचाची संख्या.
❤️600 ते 1500 – 7.
❤️1501 ते 3000 – 9.
❤️3001 ते 4500 – 11.
❤️4501 ते 6000 – 13.
❤️6001 ते 7500 – 15.
❤️7501 ते पेक्षा जास्त -17.
_३१ डिसेंबर – वर्षातील शेवटचा दिवस_*
********************************
_आज ३१ डिसेंबर ! वर्षातील शेवटचा दिवस !_
_तसा हा दिवस दरवर्षीच येतो. म्हणतात ना सर्व दिवस सारखेच नसतात. लहानपणापासून आजपर्यंत आयुष्य जगताना कधी चांगले तर कधी वाईट असे अनुभव येतच असतात. काही मिळवलेलं असतं काही गमावलेलं. काही अपेक्षा पुर्ण होतात तर एखादी गोष्ट न मिळाल्याचं दुःख. पण वेळ कुणासाठी थांबत नसते._
_जसा आलेला दिवस कधीतरी जातोच तसेच आपल्या आयुष्यातही कोणती गोष्ट कायमस्वरूपी टीकून राहत नाही. मग ते सुख असो वा दुःख. एकामागे एक चालतंच असतात. मग आपण का थांबायचं? अडचणी आणि संकटे ही आपली जिद्द आणि सहनशक्ती पाहण्यासाठी येत असतात. त्यातून आपण किती सावरून त्या परिस्थितीशी कसे दोन हात करतो हे महत्वाचं._
_एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते. आयुष्याचंही तसंच आहे. सुख दुःख तर एकामागे एक धावतंच असतात. मुळात सुख ही एक मानसिक सवय आहे, आणि ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी आणि समाधानी समजाल तितकंच सुखी रहाल. तुमच्या सुखी रहाण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो. इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत ही गोष्ट एकदा लक्षात आली की आयुष्य पहा कसं सोपं होऊन जातं._
_आयुष्याचा प्रत्येक दिवस हा शेवटचा म्हणूनच जगा. मनाच्या गाभाऱ्यात रातराणी फुलवायची की निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे. नुसतं जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं. आयुष्य सगळ्यांनाच मिळतं पण मिळालेलं ते एकदिवस संपून जाईल म्हणून रडत बसायचं की जे आहे त्यातच समाधान मानून ते अधिक सुंदर बनवायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं._
_आयुष्य हे आईस्क्रीम सारखं असतं, टेस्ट केलं तरी वितळतं आणि वेस्ट केलं तरी वितळतं. म्हणुन आयुष्य टेस्ट करायला शिका. वेस्ट तर ते तसंही होतच आहे. काय सांगावं आज जे आहे ते उद्या असेलंच. म्हणून काल जे होतं ते आज नाही म्हणत रडत बसण्यापेक्षा आज जे आहे आणि उद्या जे होणार याचा हसत हसत स्विकार करा. आयुष्याची मजा घ्यायला शिका. वेळ तर तुमची नेहमी मजा घेतच असते._
: एका ओळीत सारांश, 31 डिसेंबर 2020
★◆★ राष्ट्रीय ★◆★
रेल्वेमध्ये, नवीन रचना केलेल्या _ टूरिस्ट कोचने गती चाचणी दरम्यान ताशी 180 किलोमीटरकहा पल्ला यशस्वीरित्या गाठला – व्हिस्टाडोम टूरिस्ट कोच.
इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इनफॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) या संस्थेनी सागरी माहिती आणि पूर्वानुमान सेवांविषयी माहिती सामायिक करण्यासाठी संकेतस्थळ-आधारित एक मंच – “डिजिटल ओशन”.
समुद्रसपाटीपासून 3500 मीटर उंचीवर असलेले भारतातले सर्वोच्च उंचीवर उघडलेले हवामानविषयक शास्त्र केंद्र – लेह, लडाख केंद्रशासित प्रदेश.
_च्या अंतर्गत आंध्रप्रदेशातले कृष्णपट्टणम औद्योगिक क्षेत्र आणि कर्नाटकातले तुमकुरु औद्योगिक क्षेत्र तयार करण्यासाठीच्या उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) याच्या प्रस्तावांना अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने मान्यता दिली – चेन्नई बेंगलुरू इंडस्ट्रीयल कॉरिडोर (CBIC).
2021 साली __, पॅराग्वे आणि डॉमिनिक प्रजासत्ताक या देशांमध्ये तीन भारतीय मिशन उघडण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली – एस्टोनिया.
ईशान्य प्रदेश आणि डोंगराळ राज्यांमधून ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)’ अंतर्गत ‘सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य’ – त्रिपुरा.
या संस्थेनी अभियांत्रिकी आणि तांत्रिक संस्थांमधल्या विद्यार्थ्यांसाठी, विशेषत: मुलींसाठी, ‘लीलावती – इनोव्हेशन अवॉर्ड’ या पुरस्कार योजनेची स्थापना केली – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE).
◆◆व्यक्ती विशेष◆◆
“ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन” या संस्थेच्या GAVI मंडळामधला एक सदस्य म्हणून दोन वर्षांसाठी (2021 ते 2023) भारताचे प्रतिनिधित्व करणारा भारतीय – डॉ. हर्ष वर्धन (आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री).
“रिपोर्टिंग इंडिया: माई सेवेंटी इयर्स जर्नी अॅज ए जर्नलिस्ट” या पुस्तकाचे लेखक – सुब्रह्मण्यम जयशंकर.
इटलीच्या वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्यावतीने देण्यात आलेला, ‘भौतिक शास्त्रामध्ये परिसीमा विज्ञान (TWAS-CAS)’ यासाठी प्रथम युवा वैज्ञानिक पुरस्काराचा विजेता – प्रा. परमेश्वरन अजित (ICTS-TIFR, भारत).
◆◆क्रिडा◆◆
तिसरा भारतीय क्रिकेटपटू ज्याने तीनही स्वरूपाच्या (कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय) खेळांमध्ये देशासाठी 50 किंवा त्याहून अधिक सामने खेळले – रवींद्र जडेजा.
‘ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) रंकिंग 2020’ यामध्ये भारताचा क्रमांक – द्वितीय (प्रथम क्रमांक: ऑस्ट्रेलिया).
◆◆राज्य विशेष◆◆
गुजरातमध्ये नवीन अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (AIIMS) – राजकोट.
अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय विज्ञान व संशोधन केंद्र या संस्थेची नवीन इमारत या ठिकाणी बांधण्यात आली – बंगळुरू, कर्नाटक.
इथेनॉलच्या उत्पादनासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) अंतर्गत राज्यात उभारल्या जाणार्या देशातल्या पहिल्या संयंत्रासाठी या राज्य सरकारने करार केला – छत्तीसगड.
या नगरपालिकेने भारताच्या प्रथम ‘सोशल इंपॅक्ट बाँड’ (SIB) याच्या सह-निर्मितीसाठी ‘UNDP इंडिया’ या संस्थेसोबत सामंजस्य करार केला – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (महाराष्ट्र).
◆◆ज्ञान-विज्ञान◆◆
__या संस्थेच्या संशोधकांनी क्वांटम रँडम नंबर जनरेटर (QRNG) विकसित केला – DRDO यंग सायंटिस्ट लॅबोरेटरी फॉर क्वांटम टेक्नॉलॉजीज (DYSL-QT).
या संस्थेनी ओकूलर गाठीच्या उपचारासाठी प्रथम देशी ‘रुथेनियम 106 प्लॉक’च्या रूपात नेत्र कर्करोग उपचार पद्धती विकसित केली – भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) मुंबई.
◆◆सामान्य ज्ञान◆◆
“पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झालेल्या विशिष्ट लोकांचे नागरिकत्व हक्क” याविषयी संविधानिक तरतूद – कलम 7.
“भारताबाहेर राहणाऱ्या विशिष्ट भारतीय वंशाच्या नागरिकांचे नागरिकत्व हक्क” याविषयी संविधानिक तरतूद – कलम 8.
“परदेशी राज्याचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारलेले व्यक्ती नागरिक नसणार” याविषयी संविधानिक तरतूद – कलम 9.
“नागरिकत्व हक्कांचे सातत्य” याविषयी संविधानिक तरतूद – कलम 10.
“कायद्यान्वये नागरिकत्व हक्काचे नियमन करण्यासाठी संसद” याविषयी संविधानिक तरतूद – कलम 11.
: *????तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं जाणून घ्या????*
*मुलांना माहिती देण्यासाठी हा लेख post करत आहे* ???? ???? ????
आपण पाहतो, आपल्या घरात, आजूबाजूला राहत असलेल्या अनेकांचं कोणतं ना कोणतं टोपननाव असतचं. अनेकांना पाळण्यातील नाव हे तर असतातच. तसेच घरात आवडीने आणि वेगवेगळ्या नावाने बोलण्यासाठी अनेकांना टोपणनावे ठेवली जातात. त्याचपध्दतीने भक्कम ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या महाराष्ट्रातील विविध शहरांच्या नावालाही इतिहास आहे. त्यानंतर काही शहरांच्या नावात बदल करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेगवेगळी अशी वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची जुनी नावं बऱ्याच जणांना माहित नसतील. अशावेळी आपण बराच विचार करत असतो की, जिल्ह्याचे नाव का बदलण्यात आले. त्या मागचा इतिहास काय असेल. कशावरुन हे नाव ठेवण्यात आले असेल.असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत असतात. महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यातील काही जिल्ह्यांची नाव काळानुसार बदलत गेली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील संकेतस्थळाच्या माहितीनुसार त्या त्या शहरांचा नावांचा उल्लेख केला आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे कशी ठरली असतील ते जरुर वाचा.
*????♂️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे*
*अमरावती*
महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्योगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र अशी ओळख असलेला अमरावती जिल्हा. अमरावतीला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते. या जिल्ह्याचे मूळ नाव उमरावती होते. त्यानंतर अमरावती असे करण्यात आले.
*औरंगाबाद*
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हा हा खाम नदीच्या काठी वसलेला आहे. आजच्या औरंगाबादचे नाव पूर्वी खडकी होते. तसेच अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा व्दितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले आहे. मलिक अंबरने या शहराचे नाव फतेहपूर असे ठेवले होते. पुढे औरंगजेब या मुघल सम्राटाच्या नावावरुन औरंगाबाद हे नाव त्याच्या मृत्यूनंतर ठेवण्यात आले.
*बीड*
महाराष्ट्रातील बीड जिल्हा हा बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसलेले असल्याने बीळ या अपभ्रंशातून बीड हे नाव पडले आहे.
*भंडारा*
महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा हा पितळी भांड्यांचे शहर म्हणून ओळखला जात होता. भाणारा शब्दापासून भंडारा हे नाव पडले आहे. भाण हा शब्द भांडी या अर्थाने पूर्वी वापरला जात होता. भंडारा हे पितळी भांड्यांसाठी पूर्वापार प्रसिध्द असल्यामुळे भाण शब्दावरुन भाणारा असे नाव पडल्यामुळे त्यानंतर भंडारा असे ठेवण्यात आले.
*बुलडाणा*
बुलडाणा जिल्हा हा अजिंठ्याच्या डोंगररांगामध्ये वसलेले. हे शहर प्राचीन काळात भिल्लठाणा म्हणून ओळखले जात होते. भिल्लठाणा म्हणजे भिल्लाचे मुक्कामाचे स्थान. त्यानंतर बुलढाणा हे नाव पडले आहे.
*चंद्रपूर*
महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूरला आधी चांदा म्हणून ओळख होती. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी असेही म्हणतात. या जिल्ह्यात कोळसा खाणी आणि चुन्याच्या खाणीही आहेत.
*धुळे*
महाराष्ट्रातील धुळे जिल्हा हा पूर्वी पश्चिम खान्देश जिल्हा म्हणून ओळखला जात होता. तसेच गुजरातचा सुलतान पहिला अहमद यांने फारुकी राजांना खान ही पदवी दिलेली होती व त्यावरुन साजेशे खान्देश असे याचे नाव करण्यात आले. त्यांनतर हा जिल्हा धुळे या नावाने प्रचलित झाला.
*गोंदिया*
महाराष्ट्रातील राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृध्द असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग डिंक (गोंद) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता. त्यामुळे या जिल्ह्याचे नाव गोंदिया पडले आहे. गोंदिया शहर हे तांदळाचे शहर म्हणूनही ओळखले जाते.
*हिंगोली*
महाराष्ट्रातील हिंगोली हा जिल्हा पूर्वी विंगुली, लिंगोली या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर हिंगोली या नावाने या जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे.
*जळगाव*
महाराष्ट्रातील जळगाव हा जिल्हा पूर्व खान्देश म्हणूनही ओळखला जातो. पूर्व खानदेश अस्तित्वात असलेला जिल्हा आजचा जळगाव जिल्हा बनला आहे.
*जालना*
महाराष्ट्रातील जालना जिल्हा हा कुंडलिक नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. सुरवातीला धनवान मुहमद्दन व्यापाराच्या इच्छेप्रमाणे ज्याला या ठिकाणी खूप फायदा झाला. त्यांचा विणकामाचा (जुलाह) हा व्यवसाय होता. त्यामुळे जुलाह वरुन जालना या नावाने ओळख सुरु झाली.
*कोल्हापूर*
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठमधील एक कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मीचे देवालय स्थापन होण्यापूर्वी आणि त्यानंतरही अनेक शतकापर्यंत शहराचे जुने व सर्वसंमत असे नाव कोल्लापूर होते. पूर्वी कोला नावाचा एका असूराचा महालक्ष्मीने वध केला, त्यानंतर कोल्हापूर या नावाने ओळख सुरुवात झाली असे म्हटले जाते.
*लातूर*
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे पूर्वीचे नाव लत्तपूर असे होते. त्यानंतर त्या नावात बदल करुन लातूर या नावाने ओळख निर्माण झाली.
*मुंबई*
महाराष्ट्राची राजधानी म्हणून आपण मुंबई शहराला ओळखतो. तसेच हा जिल्हा सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच या शहराला भारताचे हॉलिवूड असेही म्हटले जाते. मुंबईतील स्थानिक रहिवासी असलेले कोळी बांधव यांची मुंबा माता ही कुलदैवत आहे. त्यामुळे मुंबईतील मुंबा आणि आई म्हणजे देवी याचे एकत्रीकरण होऊन मुंबई हे नाव देण्यात आले आहे.
*नागपूर*
महाराष्ट्रातील नागपूर हा जिल्हा कन्हान नदीची उपनदी असलेली नागनदी नागासारखीच वाहत असल्याने पूर्वी या शहराचे नाग असे नाव पडले आणि या नाग नदीमुळेच नागपूर असे नाव ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अनेक शहरांच्या नावापुढे पूर हे लावले जाते. त्यापध्दतीने नाग या नावापुढे पूर असे नाव देण्यात आले आहे आणि त्याची नागपूर अशी ओळख निर्माण झाली.
*नंदुरबार*
महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा हा धुळे जिल्ह्यातून नव्याने निर्माण झाला आहे. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खान्देश असे म्हटले जाते.
*नाशिक*
महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा त्या आसपासच्या परिसरातील विविध नावांनी ओळखला जातो. नाशिकचे जुने नाव गुलशनाबाद म्हणजे फुलांचे नगर होते. तसेच सुरवातीचे नाव त्रिकंटक होते. तसेच गोदावरी तीरावरील नऊ टेकड्यांवर वसलेले असल्यामुळे नऊ शिखरांचे शहर म्हणजे नाशिक म्हणून या जिल्ह्यास हे नाव देण्यात आले. तसेच पौराणिक काळात चौदा वर्षे राम लक्ष्मणाचा वनवास नाशिक जवळील जंगलात गेला. त्यावेळी लक्ष्मणाने शूर्पणखा नावाच्या राक्षसणीचे नाक कापले होते. संस्कृतमध्ये नाकाला नासिक म्हणतात, म्हणूनच या शहराचे नाव नाशिक असे पडले आहे.
*उस्मानाबाद*
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्याची भूमी ही श्रीराम वनवासात असताना त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मानली जाते. या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. त्यानंतर २० व्या शतकाच्या सुरवातीला तत्कालीन निजाम उस्मान अली याने स्वत:च्या नावावरुन या शहराला उस्मानाबाद असे नाव दिले आहे.
*परभणी*
महाराष्ट्रातील परभणी जिल्हा हा पुरातन काळातील प्रभावती देवीच्या मंदिरावरुन या जिल्ह्यास परभणी असे नाव देण्यात आले आहे.
*पुणे*
महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा विद्येचे माहेरघर या नावाने ओळखले जाते. तसेच राष्ट्रकूट राजवटीत या शहराचे नाव पुनवडी होते. पुण्य या शब्दावरुन पुणे अशी ओळख निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येते.
*रायगड*
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचं मराठ्यांच्या इतिहासाशी असलेले नाते अतूट आहे. रायगड जिल्ह्याचे पूर्वी कुलाबा हे नाव होते. श्री छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड किल्ला याच जिल्ह्यात असल्याने कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड असे करण्यात आले आहे.
*सांगली*
महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक या गोष्टीची सुरुवात सांगलीपासून झाली. त्यामुळे सांगलीला पूर्वी नाट्यपंढरी या नावानेही संबोधले जात होते. सांगली येथील हळद बाजारपेठ ही आशिया खंडामधील सर्वांत मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते.
*सातारा*
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यास तेथील असलेल्या सतरा बुरुजांमुळे सातारा हे नाव रुढ झाले आहे. तेथील किल्ल्याचे मूळ नाव सप्तर्षी किंवा सातदरे असे होते. त्यानंतर पुढे ते सातारा झाल्यामुळे त्याची अशी ओळख प्रचलित झाली आहे.
*सिंधुदुर्ग*
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणच्या दक्षिणेकडील भाग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पूर्वीचे नाव दक्षिण रत्नागिरी होते. मालवणच्या किनाऱ्यापासून जवळच असलेल्या बेटावरील सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन या जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले आहे.
*सोलापूर*
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयातील शिवयोगी श्री सिध्देश्वर लिखित शिलालेखानुसार सोन्नलगी हे नाव पूर्वी सोलापूर शहरास होते. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे नाव सोळा म्हणजे सोला आणि पूर असे नाव तयार झाले आहे. म्हणजे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, चादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रिकरणाने सोलापूर हे नाव पडले आहे.
*ठाणे*
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक होते. सागरी, डोंगरी आणि नागरी अशी वैशिष्टयपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभलेली आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. सर्वाधिक धरणं असल्यामुळे पाणी पिकवणारा जिल्हा अशी ठाणे जिल्ह्याची ओळख आहे.
*वर्धा*
महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याचे नाव हे जवळूनच वाहणाऱ्या वर्धा नदीवरुन देण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा शहराची ओळख निर्माण झाली आहे.
*वाशिम*
महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यास प्राचीन इतिहास लाभलेला आहे. वाशीम शहराचे प्राचीन नाव वात्सुगाम होते. प्राचीन काळी होऊन गेलेल्या वत्स ऋषीच्या नावावरुन हे नाव पडले असे म्हटले जाते.
*यवतमाळ*
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा हा पूर्वी वणी किंवा ऊन या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर जिल्ह्याचे नाव हे यवत म्हणजे टेकडीवरील सपाटीचा प्रदेश अशा शब्द रचनेतून यवतमाळ हे नाव पडले आहे.
*अकोला*
महाराष्ट्रातील अकोला या शहरात पूर्वी अकोलसिंग नावाच्या राजपूर सरदाराचा शहराशी संबंध आला. त्यानेच हे गाव वसवले असल्यामुळे अकोलसिंगाच्या नावावरुन अकोला असे नाव ठेवण्यात आले.
:
???????? रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे ????????
(जन्म : इ.स. ८ फेब्रुवारी, १८४८; मृत्यू : ९ फेब्रुवारी, इ.स. १८९७) हे एक भारतीय कामगार पुढारी होते.
नारायण मेघाजींचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरुनगर) जवळचे कन्हेरसर. माळी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले.
सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली. तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात, दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले; त्यांना आठवडयाची सुटीही मिळत नसे; परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले.
त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले. त्यांनी बॉंबे मिल हॅंड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना २३ सप्टेंबर १८८४ रोजी स्थापन केली. ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते.
इ.स.च्या १९व्या शतकात प्रथमच सुरू झालेल्या भारतातील स्वाभिमान कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे ओळखले जातात.
????????????????????????????????????????????????????????
इ.स. १८८० मध्ये पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले.
हे नियतकालिक शेतकरी-कामकरी वर्गाची बाजू हिरिरीने मांडत असे; त्यांच्या हालअपेष्टांना, दुःखाला वाचा फोडून सरकारचे व जनतेचे लक्ष वेधून घेत असे. लोखंडे यांनी गुराखी या नावाचे एक दैनिकही काढले होते.
सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, मागासलेल्यांना नोकरीत प्रवेश, विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांना जंगलच्या कायद्यामुळे होणारा त्रास, विधवांच्या केशवपनास बंदी वगैरे अनेक प्रश्नांना लोखंडे यांनी दीनबंधू ह्या मुखपत्रातून वाचा फोडली. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुर्दशा झाली असल्याचा पहिला आवाज दीनबंधूने उठविला.
सत्यशोधक समाजाचे पुरस्कर्ते आणि मुंबईतील आद्य प्रवर्तक नारायण मेघाजी लोखंडे आणि रामजी संतुजी आवटे यांनी दीनबंधूची जबाबदारी स्वीकारली. पत्रावर असलेल्या कर्जाचा बोजाही दोघांनी स्वीकारला.
मुख्य जबाबदारी लोखंडे यांच्यावर होती. त्यांनी हे पत्र पुण्याहून मुंबईला नेले. ९ मे १८८० रोजी मुंबईतून दीनबंधूचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
भालेकरांना या पत्राची जबाबदारी का सोडावी लागली, याचे विवेचन या अंकात लोखंडे यांनी केले होते. अनेक अडचणी सोसून भालेकरांनी निष्ठेने हे पत्र सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी यात भालेकरांचा गौरवही केला होता.
स्वामी दयानंद सरस्वती
(जन्म : मोरबी, १२ फेब्रुवारी १८२४; मृत्यू : मुंबई, ३० ऑक्टोबर १८८३) हे भारतीय समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक होते.
आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
स्वामी दयानंद सरस्वती यांनी वरील ग्रंथामध्ये आर्य समाजाच्या तत्त्व विचारांची मांडणी केलेली आहे स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे व तो आम्ही मिळवणारच असे प्रतिपादन करणारे पहिले धर्मसुधारक म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती हे होत
वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी दयानंदांनी १० एप्रिल १८७५ रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली.
वेदांतील तत्त्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी “सत्यार्थ प्रकाश” नावाचा ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषेत लिहिला. सत्यार्थ प्रकाश ग्रंथात वैदिक धर्माचे यथार्थ स्वरूप प्रतिपादन करताना इतर पंथमतांचे खंडनही त्यांना करावे लागले.
या प्रचारात्मक ग्रंथानंतर वेदाचा अर्थ समजण्याकरिता यांनी “वेदभाष्य” लिहिण्यास सुरुवात केली पण तो ग्रंथ अपुराच राहिला. यानंतर “संस्कारविधी” हा ग्रंथ लिहून सोळा संस्कारांचे वर्णन व प्रयोग यांनी दिले. “पंचमहायज्ञविधी” या लहानशा ग्रंथात नित्य करावयाच्या यज्ञाचे यांनी विवेचन केले.
“गोकरुणानिधी” या ग्रंथात यांच्या अंत:करणाचे प्रतिबिंब पहावयास मिळते.
???????? आर्य समाजाचे कार्य ????????
आर्य समाजाच्या तत्त्वांचा प्रचार ते प्रथम अहमदाबाद, बडोदे, पुणे, मुंबई या ठिकाणी गेले त्यानंतर दिल्ली येथे भरणाऱ्या दरबारासाठी गेले. तेथे सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना बोलाविलेले होते व चर्चेसाठी पाच प्रश्न ठेवलेले होते. दयानंदांनी त्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात व विशेषत: पंजाबात त्यांच्या मताचा चांगलाच बोलबाला झाला.
शैक्षणिक संस्था, गुरुकुले व अनाथालये निघून होमहवनादी वैदिक पद्धतीचे कार्यक्रम तिकडे होऊ लागले.
???????? महर्षी दयानंद यांनी लिहिलेली पुस्तके ????????
???? गोकरुणानिधी
???? पंचमहायज्ञविधी
???? वेदभाष्य (अपूर्ण)
???? सत्यार्थ प्रकाश
???? संस्कारविधी
*