अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल अर्जांची गुरुवारी छाननी करण्यात आली. यात २८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल.
अमळनेर तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींसाठी एकूण १३७६ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून २८ जण अपात्र झाले आहेत. त्यातील एक जण सातवी पास नाही तर दोघांचे मतदार यादीत नाव नसल्याने तर इतर जात वैधता प्रमाणपत्र टोकन नसल्याने तर एकाच प्रभागात दोन अर्ज दाखल केल्याने एक अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. यात हिंगोणे खु प्र अमळनेर येथील भिल अनिल भरत हे सातवी पास नसल्याचा पुरावा देऊ शकले नाहीत म्हणून अवैध ठरवण्यात आले आहे. तर आर्डी येथील वानखेडे नितीन अभिमन यांचे मतदार यादीत नाव नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आले. मेहेरगाव- साधना घनश्याम पाटील , सात्री-शुभांगी रावसाहेब बोरसे , सुनीता सुनील बोरसे , पिळोदे – आशा अनिल शिंदे , गडखाम्ब- सुनीता राजेंद्र बोरसे , उज्वलबाई नंदलाल पाटील , संगीताबाई हनुमंतराव पाटील , म्हसले – अल्काबाई प्रल्हाद पाटील , टाकरखेडा- वैशाली जितेंद्र पाटील , सरला धनराज सोनवणे , दापोरी बु – योगिता भटू पाटील , शिरूड- लोटन दामू बैसाणे, सावखेडा दुर्गाबाई नवल पाटील , पातोंडा- पाटील मेघनाथ देविदास , पवार प्रवीण गुलाब , पवार रेखाबाई प्रवीण , बिरारी मनीषा प्रवीण , वासरे- मनेश रामचंद्र पाटील , चौबारी- पारधी वसंताबाई भाऊराव , शहापूर – रत्नबाई बाळू पाटील , बोहरा- रंभाबाई भीमराव भिल , कळमसरे- प्रमिला रमेश चौधरी , कलाबाई रमेश चौधरी , बोदर्डे- पूजा हिरामण भिल , लोणचारम- मंदाकिनी अनिल पाटील , कावपिंप्री – मनीषा राजेंद्र पाटील , यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत.