खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या कापसाचे शेवटचे बोंड मोजले जाण्यासाठी तीन जिनिंगमध्ये होणार मोजमाप

आमदार अनिल पाटील यांनी कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ प्रसंगी दिली ग्वाही

अमळनेर(प्रतिनिधी) शेतकऱ्यांचे शेवटचे बोंड मोजले जाईपर्यंत कापूस खरेदी सुरू राहील. यासाठी तीन जिनिंग मध्ये कापूस खरेदीसाठी मोजमाप सुरू राहील अशी ग्वाही आमदार अनिल पाटील यांनी कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ प्रसंगी दिली. तसेच
प्रतिक्विंटल १ हजार रु बोनस मिळावा याबाबत मागणी करू, असेही सांगितले.
कापूस खरेदी शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर पणन संचालक संजय पवार, माजी आमदार स्मिता वाघ, पणन माजी संचालिका तिलोत्तमा पाटील, जि.प. सदस्या जयश्री पाटील, पं.स. माजी सभापती शाम अहिरे, माजी पणन संचालक सुभाष चौधरी, अनिल शिसोदे, सहाय्यक निबंधक गुलाबराब पाटील, लामा जिनर्सचे विनोद कोठारी, विभागीय व्यवस्थापक ए. के. गिरमे, उपव्यवस्थापक आर जी होले, बाजार समिती सचिव उन्मेष राठोड, बाळासाहेब सिसोदे, यतीन कोठारी, केंद्रप्रमुख अनिल कदम आदी उपस्थित होते. कापूस पणन महासंघाचे निवृत्त कर्मचारी ए. बी. निकम यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार स्मिता वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच प्रा. गणेश पवार यांनी विविध मागण्या केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार बाळासाहेब शिसोदे यांनी मानले.

स्व. उदय वाघ यांची जागवली आठवण

संजय पवार म्हणाले, लामा जिनिंगमध्ये गेल्या वर्षी शुभारंभ करतांना स्व. उदय वाघ यांची आठवण आली. व कापूस खरेदी बाबत उदय वाघ यांचा पहिला फोन आला होता. या आठवणींना उजाळा दिला. तसेच खरेदी १५ दिवस उशिरा झाल्याने दिलगिरी व्यक्त केली.  पणन महासंघात विदर्भाचा प्रभाव असल्याने अजित पवार यांच्याकडे पणन महासंघाच्या मागण्या मांडा. ग्रेडर संख्या ६० आहेत. कापूस खरेदी केंद्रांसाठी  केंद्रप्रमुख ग्रेडर नियुक्ती करा. १ हजार रु बोनस मिळावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करा. सध्या खान्देशात खरेदी विक्री केंद्राची दुरवस्था आहे. त्याला ऊर्जितावस्थेत आणावी अशा मागण्या केल्या. व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

या तीन जिनिंगमध्ये होईल कापूस मोजणी

येथील लामा जिनिंग, शिवशक्ती जिनिंग आणि लक्ष्मी जिनिंग अशा तीन ठिकाणी मोजमाप होईल. दररोज १५० वाहने मोजमाप करण्यात येतील. तरी शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची घाई न करता सर्वांचे मोजमाप होईल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button