खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

खवशी येथे ३२ सेवेकरी करताय गुरुचरित्राचे पारायण वाचन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील खवशी येथे येथे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल विकास केंद्रामार्फत श्री गुरूचरीञ पारायण वाचण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ३२ सेवेकरी पारायण वाचण्यास बसले आहे.
खवशी येथे गुरूचरीत्र पारायणाचे यंदा ११वे वर्ष आहे. विशेष म्हणजे दर वर्षी गुरूचरीत्र सकाळी ४ते ६ ह्या वेळेतच वाचले जात असून एकही वर्षी वेळेत बदल करण्यात आलेला नाही. गुरूचरीत्र पारायण हे सामुदाईकरित्या  केले जाते. दररोज सकाळी ४ ते ६ गुरूचरीत्र पारायण वाचन, ६ते ६.३० भुपाळी आरती , सकाळी १०.३० नैवेद्य आरती, संध्याकाळी ६.३० वाजता नैवेद्य आरती, विष्णूसहस्रनाम वाचन, संपूर्ण श्री स्वामी समर्थ नित्यसेवा, श्री स्वामी समर्थ माळ जप  आदी धार्मिक उत्सव होणार असून दिनांक २९ डिसेंबर रोजी दुपारी १२.३९ वाजता दत्त जन्मोत्स साजरा करण्यात येणार आहे. या  कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ, घ्यावा असे श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल विकास केंद्र खवशी यांच्या मार्फत कळवण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button