खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

रोटरी क्लब अमळनेर आयोजित शिबिरात ३० दात्यानी केले रक्तदान

अमळनेर (प्रतिनिधी)रोटरी क्लब अमळनेर व एच.डी.एफ.सी. बॅक,अमळनेर व जिवन ज्योती रक्त पेढी, अमळनेर याच्या संयुक्त विद्यमाने  झालेल्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ३० दात्यानी रक्तदान केले.
जागतिक महामारीच्या कळात औषधे, दवाखाने, साहित्याची चणचण होतेय तशीच रक्ताची सुध्दा खुपच कमतरता जाणवली, यासाठी अमळनेर रोटरी क्लबने लाॅकडाउन सुरू झाल्यापासून रक्त दानासाठी जन जागृती केली व गरजूंना रक्त पुरवण्यात आले. वाढलेली रक्ताची गरज पहाता शिबीर घेण्याचे ठरविण्यात आले, यासाठीची जनजागृती करण्यात आली व शहरातील ईतर इच्छूक संस्थाना सोबत घेवून हि रक्ताची गरज पुर्ण करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय ३० रक्त दात्यानी स्व.इच्छेने रक्त दान केले.
यात रक्तदान शिबीर दि. २०-१२-२०२० वार रविवार रोजी रोटरी हाॅल येथे आयोजीत करण्यात आले. यावेळी रो.डाॅ.शरद बावीस्कर, रो.डाॅ. किरण बडगुजर, रो.डाॅ. राहूल मुठ्ठे, एच.डी.एफ.सी. बँकेचे कार्तिक जैन, जगदीश माझी, जिवनश्री रक्त पेढीचे श्री. संतोष पाटील रो. प्रतिक जैन, रो. रोहीत सिंघवी व प्रोजेक्ट चेअरमन रो.ताहा बुकवाला व सर्व रोटरी सभासदांना मेहनत घेतली व सहकार्य केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button