चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांबाबतचा अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी

तहसीलदार, गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांबाबतचा अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्द करावा व माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी अमळनेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ११ डिसेंबर २०२० चा चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांबाबतचा अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्द व्हावा.शासन नियुक्त समितीने शिफारस केल्यानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ( शिपाई सेवक , लिपीक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहायक इ . ) अनुकंपासह तत्काळ भरती करण्यात यावी. माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बक्षी समितीने शिफारस केलेल्या १०, २०, ३० वर्षानंतरचा लाभ तत्काळ लागू करण्यात यावा. माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी २४ वर्षाच्या लाभाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची तत्काळ अंमलबजावणी करावी. राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत पदोन्नतीस व अनुकंपा नियुक्तीस तत्काळ मान्यता देण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या वेळी अमळनेरचे पदाधिकारी कैलास जगन्नाथ पाटील, तालुका अध्यक्ष कार्याध्यक्ष रविंद्र विठ्ठलराव चव्हाण, तालुका उपाध्यक्ष अजय श्रीराम पाटील, प्रमोद देविदास बहिरम, विनोद भिकनराव सोनवणे, तालुका सचिव सुनिल दिनकर, चौक तालुका महिला सदस्य झाकीर खाटीक, तालुका अल्पसंख्यांक सदस्य तालुका सदस्य रविंद्र तुकाराम पाटील, श्याम मोहनलाल पवार सुभाष आत्माराम पाटील, श्रीकांत पुरुषोत्तम कुलकर्णी, बाळू लोटन पाटील, प्रभाकर दगडू पवार, अवचित राजाराम बागुल, ग्रंथपाल सदस्य जितेंद्र हरिचंद्र ठाकुर, प्र . शा . सहा . सदस्य संजय दौलतराव सूर्यवंशी, तालुका तज्ञ मार्गदर्शक अनिल भिकाजी घासकडबी, एस . एन . पवार उपस्थित होते.

अमळनेर तालुका खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेमार्फतही निवेदन

अमळनेर तालुका खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेमार्फत तहसीलदारांना निवेद देण्यात आले. या वेळी अमळनेर तालुका पीडीएफ संघटनेचे माजी अध्यक्ष संदीप घोरपडे, पीडीएफ जिल्हा कोषाध्यक्ष एस. एन. पाटील, अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील, माजी अध्यक्ष पी. बी. एस. पाटील, अमळनेर तालुका शिक्षक व क्रीडा संघटनेचे अध्यक्ष एस. के. पाटील , जळगाव जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे उपाध्यक्ष आर. डी. बोरसे, तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष के. जे. पाटील, सचिव सुनील चौक, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण व कार्य करण्याचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख जितू ठाकूर व तालुक्यातील १०० शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच गटशिक्षणाधिकारी यांनाही निवेदन देताना संघटनेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे माजी सेक्रेटरी तुषार पाटील पीडीएफ संघटनेचे तालुका अध्यक्ष सुशील भदाणे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *