अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलतर्फे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १८ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. तर रक्तदात्यांचा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सप्ताह अंतर्गत शिबिर घेण्यात आले. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, तालुका कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील,जिल्हा उपाध्यक्ष संजय भिला पाटील, जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खाटीक, रफिक शेख, लतीफ पठाण, मुशीर शेख, आबीद सैयद, कौसर शेख, रणजित पाटील, बाळू पाटील, माजी नगरसेवक राजू फाफोरेकर, सनी गायकवाड, गणेश पाटील, प्रदीप पाटील, शुभम पाटील, सोनू पाटील, रिता बाविस्कर आशा चावरीया, योजना पाटील, वसीम पठाण, उमरखान पठाण, सादिक शेख, युनूस पठाण, नईम शेख, बाबू शेख, रिजवान अन्सारी, इम्रान अन्सारी, वसीम खान फारुख शेख, सद्दाम मुजावर, सुलतान खाटीक, जुबेर खाटीक आदी उपस्थित होते.