अमळनेर(प्रतिनिधी) शिक्षकेतर कर्मचारी भरती संदर्भात शासनाने घेतल्या निर्णयाविरोधात शिक्षण संस्थाचालक १८ डिसेंबरबासून शाळा बंद आंदोलन करणार आहेत.
राज्य संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील व महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर संघटना महासचिव मिलिंद जोशी यांच्यात झालेल्या चर्चे नुसार हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा काळा जी.आर.रद्द करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व शिक्षकेतर बंधू-भगिनींनी शाळा बंद आंदोलनात सहभागी होऊन एकजूट दाखवावी तसेच दिनांक 18 डिसेंबर रोजी शिक्षणाधिकारी( माध्यमिक) जिल्हा परिषद जळगाव यांना निवेदन देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जळगाव जिल्हा खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेचे सचिव आर. टी. मोरे यांनी केले आहे.