प्रदुषण निर्मुलन आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आले निर्णय
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता सोमवार ऐवजी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. तर प्रदूषण रोखण्यासाठी सोमवारी नो व्हेईकल डे पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रातांधिकारी सीमा अहिरे यांच्या कार्यालयात व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत दर रविवारी अमळनेर तालुक्यात जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी जाहीर केला. तर दर सोमवारी नो व्हेईकल डे पाळण्यात येणार आहे. रविवारी वैद्यकीय सेवा, औषधी दुकाने , कृषी दुकाने , दुग्ध व्यवसाय व्यतिरिक्त सर्व दुकाने व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात येणार आहेत तर दर सोमवारी नो व्हेईकल डे पाळण्याचे आवाहन पालिकेने केले असून या दिवशी पायी किंवा सायकलवर फिरावे, असेही आवाहन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.