व्हर्च्यूअल रॅलीतून शरद पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केली उर्जा

प्रतिनिधी (अमळनेर)- राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदरा शरद पवार यांनी शनिवारी वाढदिवासनिमित्ताने डिजिटल व्हर्च्यूअल रॅलीतून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून काम आणि संघटन मजबूत करण्यासाठी एक नवी उर्जा दिली.
अमळनेर येथे आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनात जी.एस. हायस्कुलमधील आयएमए हॉल येथे आयोजन करण्यात आले. सुरवातीला जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, ग्रंथालय पदाधिकारी रिता बाविस्कर, अनिल शिसोदे आदींनी शरद पवार यांच्या विषयी मत व्यक्त केले. नंतर लाइव्ह कार्यक्रमात नागपूर येथून गृहमंत्री अनिल देशमुख, एकनाथराव खडसे (जळगाव), छगन भुजबळ (नाशिक), धनंजय मुंडे(बीड), हसन मुश्रीफ(कागल) येथून ऑनलाइनद्वारे व्हर्च्यूअल सभेस संबोधन केले. त्या नंतर शरद पवार यांच्या वाढदिवस निमित्त मुंबई येथील कार्यक्रमात बेरोजगार मेळावा शुभारंभ व पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला .तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांना शरद पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

८० हजार दिनदर्शिका होणार वाटप

आमदार अनिल पाटील यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काढलेल्या ८० हजार दिनदर्शिका मतदार संघात वाटप करण्यात येणार आहे. प्रारंभी कार्यक्रमाची रूपरेषा तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी मांडली. सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले .अनिल शिसोदे यांनी आभार मानले. कार्यक्रमावेळी प्रा.अशोक पवार,प्रा.सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, प्रदेश प्रतिनिधी शिवाजीराव पाटील, पं.स.सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव, कृ.उ.बा.संचालक विजय पाटील, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील,आशा चावरीया, रंजना देशमुख, अलका पवार, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष विनोद पाटील, नगरसेवक यज्ञेश्वर पाटील, मेजर आण्णा, बाळु पाटील, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष निलेश देशमुख, हिंमत पाटील, सुनिल शिंपी, गौरव पाटील, सचिन बेहरे, प्रदीप पाटील, महेश पाटील, हिम्मत पाटील, श्रीनाथ पाटील दर्पण वाघ, पप्पू कलोसे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *