ग्रामीण भागातील मुलीही स्पर्धा परीक्षेतून घेणार फिनिक्स भरारी

आयजी दिघावकर मंगरुळला मुलींचे स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभारणार

पीक विमा मंजूर असूनही मिळत नसल्याची शेतकऱ्यांनी केली तक्रार

अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील मुलींनाही स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावे, यातून त्यांनीही फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यासाठी मंगरूळ येथे मुलींचे स्पर्धा परीक्षा केंद्र आणि संगणक प्रयोगशाळा उभारणार असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी दिली. यामुळे मुलींना एक आशेचा किरण मिळाला आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर हे जळगाव जिल्ह्यात पोलिस ठाण्यांची तपासणीसाठी आले असता त्यांनी मंगरूळ येथील ग्रामविकास शिक्षण मंडळास सदिच्छा भेट दिली. या वेळी संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयास डॉ अस्मिता प्रतापराव दिघावकर असे नाव देण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, ग. स. बँकेचे माजी चेअरमन झाम्बर राजाराम पाटील , संस्थेचे अध्यक्ष युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील , सुहासिनी पाटील उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिघावकर पुढे म्हणाले की उच्च पदावर जाण्यासाठी पैशाची गरज नसते. वाचनाची आवश्यकता असते. मी फक्त १२०० रुपयात आयजी झालो आहे. सामान्य विद्यार्थी सतत दोन वर्षे अभ्यास करेल तर निश्चित यशस्वी होईल.
या वेळी शेतकी संघाचे माजी अध्यक्ष संजय पुनाजी पाटील, काँग्रेसचे तालुका प्रभारी बी. के. सूर्यवंशी यांनी काही शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होऊनही विमा मिळत नसल्याची तक्रार केली. तर माजी आमदार पाटील यांनी देखील एका युवकाची बुडीत रक्कम मिळण्याविषयी तक्रार केली. किरण पवार यांनी मठगव्हान येथील सरपंचवरील अन्यायाबाबत तक्रार केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. या वेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. शकील काझी , नगरसेवक प्रताप शिंपी, पातोंडयाचे महेंद्र पाटील ,राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे भूषण भदाणे , मुन्ना पवार , गोविंदा बाविस्कर , पोलीस पाटील भागवत पाटील, जितेंद्र ठाकूर ,मुन्ना शेख ,विश्वास पाटील , योगेश पाटील , मुख्याध्यापक प्रकाश पाटील , अशोक सूर्यवंशी ,प्रभूदास पाटील , राजेंद्र पाटील ,शशिकांत पाटील , जितेंद्र पाटील , एस. बी. पाटील , श्रुती पाटील ,सुषमा सोनवणे , सीमा मोरे , शीतल चव्हाण ,प्रवीण पाटील, राहुल पाटील ,मनोज पाटील ,प्रदीप पाटील , योगेश जाधव , सुदर्शन पवार , संदीप पाटील , चंद्रशेखर पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *