आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते महाआवास अभियानाचा शुभारंभ

अमळनेर (प्रतिनिधी) जी. एस. हायस्कुलमधील आयएमए हॉलमधील महाआवास अभियानाचा बुधवारी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. घरकुलाचा नावीन्यपूर्ण सुसज्ज आणि गुणात्मक घरकुल असावे, याबाबत वाटचाल करा असे आवाहनही आमदार अनिल पाटील यांनी या वेळी केले.
या वेळी माजी पंचायत समिती सभापती श्याम अहिरे, पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील आदी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व सरपंच यावेळी उपस्थित होते. माजी सभापती शाम अहिरे यांनी जे ग्रामसेवक लाभार्थ्यांना जास्त मदत करतील त्या गावात जास्त घरकुले होतील. घरकुलांबाबत १ लाख ३५ हजार रुपये प्राप्त होणार असन गावातील राष्ट्रीयकृत दत्तक बँकेकडून ७० हजार कर्ज सर्व्हे करताना एकत्र करा कुणाचीही तक्रार राहणार नाही. जेवढी चांगले घरे बांधण्यास सांगाल तितकी घरे चांगली येतील व घरकुले सुंदर दिसतील. पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील यांनी तालुक्यात ही योजना एक नंबर वर राबवू आणि एक नंबरवर येऊ याबाबत खात्री दिली. तरवाडे सरपंच रामकृष्ण पाटील यांनी वाळू मिळत नाही, हप्ते पडत नाही, घरकुलाबाबत वाळूचा प्रश्न सोडवा, अशी मागणी केली.

उत्कृष्ट घरकुलांना बक्षीस …

प्रास्ताविक करताना गटविकास अधिकारी संदीप वायाळ २० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी पर्यंत ८ लाख घरे ग्रामीण भागात बांधणार असल्याचे उद्दिष्ट आहे. राज्य केंद्र शासनाचे घरकुले ही घरकुले बांधणार आहेत. अमळनेर तालुक्यात ब यादी सुरुवात होणार असून १०० टक्के लाभार्थी मंजुरी केली जाणार आहे. लाभार्थीकडे जागा नसेल तर पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेतून शासन यात जागा खरेदी उपलब्ध करून देणार आहे. उत्कृष्ट घरकुलांना बक्षीस ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा स्तरावर यांना बक्षिसे राज्यस्तरावर सन्मान करण्यात येणार. राज्यात पहिला तालुका म्हणून अमळनेर तालुक्याने क्रीम आणि मरून कलर करणारा महाराष्ट्रात पहिला तालुका असल्याचे गटविकास अधिकारी वायाळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *