अहो, दादा जरा जपीसन…. लोके काय म्हणतीन…!

ओ, मना दादा रे पालिका मा हाई काय चाली ऱ्हायन हों….

सफाई, पाणी, रस्ते आदी मुलभूत सुविधांसाठी ही जनता मौताज..

अमळनेर (प्रतिनिधी) नगरपालिकेच्या निवडणुकीला मोजून मापून नऊ, दहा महिने शिल्लक असल्याने जनतेच्या पैशांची अमाप उधळपट्टी सुरू झाली आहे. सफाई, पाणी, रस्ते आदी मुलभूत सुविधांसाठी ही जनता मौताज झाली असून यावर कोणीही तोंड उघडायला तयार नाही. “वराती मागून घोडे” तसे कामानंतर टेंडर अशी उफरटी कामे करून अमळनेरकरांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे अहो दादा जरा जपून लोके काय म्हणतीन….मना दादा रे नगरपालिकामा हाई काय चाली ऱ्हायनं रे… असे नागरिक विचारू लागले आहेत.
शहरविकास आघाडीच्या नेतृत्त्वाखाली गेल्या चार वर्षांपासून नगरपालिकेचा कारभार सुरू आहे. याचे नेतृत्त्व माजी आमदार साहेबराव दादा करीत आहे. तर नगराध्यक्षा म्हणून त्यांच्या सुविध्य पत्नी पुष्पलता पाटील आहेत. शहर विकास आघाडीचे २३ ते २४ नगरसेवक आहेत. तर माजी आमदार शिरीष चौधरी गटाचे १० नगरसेवक आहेत. त्यांच्याकडून अपात्र नाट्य चांगलेच रंगले होते. त्यानंतर तेही आता “शांत” झाले आहेत. त्यांनाही काही चुईंगम दिले की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. तर आमदार अनिल पाटील यांना निवडणुकीत हातात हात देऊन चांगली साथ दिल्याने तेही नगरपालिकेत लक्ष घालत नाही. त्यामुळे मनमौजी कारभार सुरू आहेत. तर बहुतांश नगरसेवकांचा कालावधी हा अपत्रातेच्या फासात अडकल्याने त्यांना आपल्या वार्डात काहीही करता आलेले नाही. त्यामुळे आगामी काळातील त्यांचे भवितव्यही अंधारात आहेत. कामे मागितली तर मिळत नाही, ब्र शब्द काढला तर टारगेट केले जाते. तोंड दाबून बुक्यांचा मार सुरू आहे. मांजरीच्या गळ्यात कोण घंटा बांधणार अशी गत या नगरसेवकांची झाली आहे. तर काही बोटावर मोजण्या इतकेच एक, दोन नगरसवेकांची कामे होत आहे. ते तुपाशी तर बाकीचे उपाशी असल्याने नाराजी नाट्य दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही नगरध्यक्षाही नगरसेवकांच्या संपर्कात नाही. त्यामुळे ही वादळा पूर्वीची शांतता शहर विकास आघाडीला आगामी निवडणुकीत बुडेवले की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणचाही कोणात पायपुस दिसत नाही, त्यामुळे नेमकी नगरपालिका कोण चालवते? असा प्रश्न उपस्थित होऊन धुसफूस आणि कुजबूज सुरू आहे.

अरे तो काही कामना नई…

आगामी निवडणुकीला नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी असल्याने प्रत्येक नगरसवेकाला कामे करण्यासाठी कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे कामे घेण्यासाठी दादांकडे गेल्यावर तोंड पाहून कामे दिली जातात. अरे तो काही कामना नई, असे म्हणत बोळवण केली जात आहे. त्याने आवाज उठवला तर त्याच्या दुसऱ्याच कुरापती काढण्याचा सज्जड दम दिला जात आहे, अशी माहिती अनेक नगरसेवकांनी नाव न छापण्याच्या अटीवर खबरीलाल जवळ आपली कैफियत मांडली आहे. तिच गत नगरपालिका कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये आहे. एखाद कमर्चारी किंवा अधिकाऱ्याने थोडे ही का-कू केले की त्याचा टेबल बदलवला जात आहे. किंवा कारणे दाखवा नोटीसी द्वारे निलंबनाची धमकी दिली जात आहे. त्यामुळे त्यांच्यातही नाराजीचा सूर घुमू लागला आहे.

साफसफाई, पाणीवर उधळा पैसा….

शहरातील साफसफाईचा ठावठिकाणा नाही, नगरपालिकेसमोरील रस्त्याचेच तिनतेरा वाजले आहे. त्यामुळे शहरातील इतर रस्त्यांचा विचारच न केलेला बरा, हिवाळा असूनही चार पाच दिवसांनी पाणी येते. उन्हाळ्यात की पंधरा दिवसांनी पाणी, येते   अशी शंका आता नागरिकांना वाटू लागली आहे, त्यामुळे इकडे तिकडे पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा पाणीवर पाणीसारखा पैसा खर्च केले तर नागरिकांचे पाण्यासाठी हाल होणार नाही, ठोस असे मनात भरेल, असे कोणतेही काम शहरात झालेले नाही, “दादानी सर्व आशावर पाणी फिराई देल शे, त्यामुळे दादा व्हॉट इज दीस,” असे लोक विचारू लागले आहेत. लोकांबरोबरच खबरीलालची ही नजर नगरपालिकेच्या पैशांच्या उधळपट्टीवर नजर आहे.

दादा आथा ना तथाना….

नगरपालिकेत शहर विकास आघाडीची सत्ता असतानाही नेमकी कोणत्या पक्षाची सत्ता आहे, हे अजूनही कोणाला छातीठोकपणे सांगता येत नाही, कारण दादा कधी राष्ट्रवादीच्या अंगणात तर कधी भाजपाच्या मैदानात डोलताना दिसतात. आमदार असताना केलेली विकास कामे अजूनही नागरिकांच्या लक्षात आहेत. दादांसारखे काम कोणी करेल माहीत नाही, अभ्यास पूर्वक माणूस आहे. म्हणूच आमदार की गाजाळेल शे, त्यावेळी शासन आणि प्रशासन या दोन्हींवर जरब होती. आता ती ढिली झाली आहे. “आते नगरपालिकाना काहिस्नासाठी सेटिंग लाईसनी धुवाँधार बॅटींग सुरू शे”. नको तठे पैसा ओतीसनी तिजोरीत खळखळाट व्हही राहेनी. आमदारकी सारखी कारकीर्दची अपेक्षा नागरिकांना होती. पण राजकीय भुमिकाही दादांची आता स्पष्ट नाही, “दादा आथाना का तथाना शेत, हाई आजही लोकसले उमजत नही.. म्हणून “आधंळ” दळतय आणि “कुत्र” पीठ खातय, अशी गत नगरपालिकेची झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *