भारत बंदच्या हाकेला नागरिकांसह शेतकऱ्यांनी दिली उत्स्फूतर्पणे साद

बंदसाठी रॅली काढून केंद्र सरकारचा नोंदवला निषेध

अमळनेर (प्रतिनिधी) केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयकांच्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मंगळवारी दिलेल्या भारत बंदच्या हाकेला अमळनेकरांनीही उत्स्फूतर्पणे साद दिली. यात अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, किसान मोर्चा आणि विविध सामाजिक संघटनेतर्फे उत्स्फूतर्पणे बंद पाळून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.
शहरातील विजय मारुती मंदिराजवळ सकाळी साडे नऊ वाजता सर्व करकर्ते उपस्थित झाले. त्यानंतर त्यांनी बंद रॅलीला सुरुवात केली. आमदार अनिल पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, शिवाजीराव पाटील, काँग्रेसचे बी. के. सूर्यवंशी, शिवसेनेचे तालुका प्रमुख विजय पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुरेश पाटील, पंचायत समिती सदस्य विनोद जाधव, भारती गाला, किसान मोर्चाचे रमेश पाटील, जगदाळे, प्रा. विश्वास पाटील, बन्सीलाल भागवत, इम्रान खाटीक, प्रताप शिंपी, मुख्तार खाटीक, शेतकरी संघटनेचे शिवाजीराव पाटील, गोविंदा बाविस्कर, अरुण देशमुख, भागवत पाटील, बाळू पाटील, अरुण शिंदे, गौरव पाटील उपस्थित होते.

सीड्स, पेस्टीं,फर्टी असो.१००टक्के बंद

अमळनेर तालुका सीड्स, पेस्टीं,फर्टी असोसिएशनतर्फे १०० टक्के बंद पाळण्यात आला. संघटनेचे पदाधिकारी विजय जैन, प्रशांत भदाणे, योगेश पवार, जीतू पाटील, सुधाकर पाटील, संदीप पाटील सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, आर.पी.आय (कवाडे गट), राष्ट्रीय किसान मोर्चा, लोकसंघर्ष मोर्चा व इतर घटक पक्ष, अमळनेर तालुका सीड्स, पेस्टीं, फर्टी असोसीएशन, तसेच विविध संघटनेतर्फे अमळनेर बंद आंदोलनात सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *