मंदिर संस्थानने घेतला निर्णय, त्रिपुरारी पौर्णिमेला भाविक दर्शनापासून मुकणार
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता अंतुर्ली येथील कार्तिक स्वामिंचे मंदिर त्रिपुरारी पौर्णिमेला २९ रोजी बंदच ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. यामुळे यंदा भाविकांना कार्तिक स्वामींच्या दर्शनापासून मुकावे लागणार आहे.
कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर कार्तिक स्वामी मंदिर गेली ८ महिने बंद होते. परंतु शासनाच्या आदेशानुसार भाविकांच्या दर्शनासाठी ते उघडण्यात आले. त्यात आता कार्तिक महिन्यातील त्रीपुरारी पौर्णीमा २९ नोव्हेंबर रोजी आहे. मात्र कोरोनाची येणारी दुसरी लाटेची वस्तुस्थिती पहाता जिल्हा व परिसरातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली आहे. यावर खबरदारी म्हणून तसेच शासनास मदत म्हणून संस्थानाने भाविकांच्या व नागरिकांच्या हितासाठी येणाऱ्या श्रीपुरारी पौर्णिमेला भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मंदिर पूर्ण भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नित्य कार्यक्रम व महापूजा होणार
कोरोनच्या पार्श्वभूमीवर मंदिर २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान बंद असले तरी या कालावधीत मंदिरात होणारे नित्येनियमांचे कार्यक्रम, महापूजा संस्थापनच्या वतीने होतील.
शिवाजीराव आनंदराव पाटील, अध्यक्ष, मंदिर संस्थान