लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही संविधानातील मूल्ये ः रणजित शिंदे

अमळनेर (प्रतिनिधी ) “लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही संविधानातील मूल्ये आणि राष्ट्राची एकता व एकात्मता बळकट व्हावी, यासाठी नागरिकांनी कर्तव्यांचे पालन करावे, असे मत मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी व्यक्त केले.
सरस्वती विद्या मंदिर शाळेत संविधान दिवस साजरा करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक शिंदे बोलत होते. संविधान दिवसानिमित्त सामूहिकपणे उपस्थित शिक्षकांनी संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन केले. याप्रसंगी भारतीय संविधान याबाबत शिक्षकांनी चर्चा केली. याप्रसंगी उपशिक्षक आंनदा पाटील, संगिता पाटील, गीतांजली पाटील, परशुराम गांगुर्डे, ऋषिकेश महाळपूरकर, धर्मा धनगर आदिनी संविधान उद्देशिकाचे वाचन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *