अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु. पाटील कला महाविद्यालयात गुरुवारी “राष्ट्रीय सेवा योजना” विभागामार्फत “भारतीय संविधान दिन” ऑनलाइन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे पूजन व वाचन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. वसंत देसले आणि कबचौउमविचे विद्यार्थी विकास विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. पवन पाटील उपस्थित होते. भारतीय सविधान प्रास्ताविकेचे पूजन करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रास्ताविकेचे वाचन व एकात्मतेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पवन पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी केले. आभार सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ, दिलीप कदम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. कु. नंदा कंधारे, क्रीडा संचालक प्रा. डॉ. देवदत्त पाटील, ग्रंथपाल प्रा. विजय पाटील व सचिन साळुंखे हे उपस्थित होते. या ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये सुमारे तीस पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.