अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कोरोनाच आलेख घसरत असला तरी काही ठिकाणी अजूनही रुग्ण आढळून येत आहे. गुरुवारी आलेल्या अहवालातही ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
अमळनेर तालुक्यात कोरोनाने संसर्गाने दिलासा दिला होता. काही दिवसांपूर्वी सलग चार ते पाच दिवस एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. त्यानंतर आता दिवाळी संपल्याने काही रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी आलेल्या अहवालात अमळनेर शहरात ३ नवीन रुग्ण आहे.
तर हे दोन्ही रुग्ण शहरातील आहे. तसेच २ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत. तर एकूण रुग्ण संख्या ही ४४८३ ऐवढी झाली आहे. तर गुरुवारी २ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ४३६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या रुग्णालयात २० रुग्ण उपचार घेत असून कोरोनाने आतापर्यंत १०३ जणांचा बळी घेतला आहे.