अमळनेर (प्रतिनिधी) चोरट्यांनी रिलायन्स कंपनीच्या दोन टॉवरच्या केबिनमधून डिझेल व बॅटरी चोरून गेल्याची घटना २५ रोजी तालुक्यातील जैतपिर व गलवाडे येथे घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तंत्रिक भिकन पाटील व नानभाऊ पाटील हे गलवाडे येथे टॉवर पाहणीसाठी गेले असता तेथून ७ हजार ६०० रुपये किमतीचे १०० लिटर डिझेल चोरीला गेलेले दिसून आले. तसेच ५ हजार रुपये किमतीची १२ व्होल्टची बॅटरी चोरीस गेलेली आढळून आली. तसेच गलवाडे येथील टॉवरची देखील पाहणी केली असता तेथेही जनरेटरचे कुलूप तोडून ५ हजार रुपये किमतीची बॅटरी चोरीस गेलेली आढळून आली. अज्ञात चोरट्यांनी दोन्ही ठिकाणी १७ हजार ६०० रुपयांचा माल चोरून नेला. रिलायन्स जिओचे सुपरवायझर महेश कासार यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सचिन निकम करीत आहेत.