महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनच्या अध्यक्षपदी सोलापूरचे दत्तात्रय नाईकनवरे

उपाध्यक्षपदी ‘खबरीलाल’चे संपादक जितेंद्र ठाकूर, सचिवपदी अॅड. अद्वैत चव्हाणांची वर्णी

लोकशाही पद्धतीने ऑनलाइन मतदान घेऊन पदाधिकाऱ्यांची बहुमताने निवड

अमळनेर (प्रतिनिधी) डिजिटल न्यूज पोर्टलच्या हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सोलापूर येथील दत्तात्रय नाईकनवरे यांची तर उपाध्यक्षपदी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील खबरीलालचे मुख्य संपादक जितेंद्र ठाकूर तर सचिवपदी अमरावती येथील ॲड. अद्वैत चव्हाण यांची ऑनलाइन लोकशाही पद्धतीने व बहुमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
सामाजिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय, धार्मिक आदी कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना संघटनेला महत्व आहे. अलिकडील ३ ते ५ वर्षात डिजिटल मीडियाचे महत्त्व वाढले असून केंद्र सरकारने डिजिटल मिडियाला मेनस्ट्रिम मीडिया म्हणून दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील असून राष्ट्रपती यांनीही स्वाक्षरी केली आहे.
डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकार, प्रतिनिधी व संपादक यांच्या न्याय हक्कासाठी काम पाहणाऱ्या देशातील पहिल्या असोसिएशन ऑफ डिजिटल मीडिया अॅण्ड इंडिपेंडण्ट न्यूज पोर्टल (ॲडमिन) संघटनेच्या यशस्वीतेनंतर महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनची (एमडीएमए) स्थापना करण्यात आली आहे. डिजिटल मीडियामधील पत्रकारांना संघटीत करून त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन काम करणार आहे. या महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन संघटनेची महाराष्ट्रात नव्हे तर देशातील पहिली लोकशाही मार्गाने काम करणारी  एकमेव संघटना आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन या स्व नियामक संस्थेच्या पदाधिकारी नियुक्ती करण्यासंदर्भात २२ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन बैठक पार पडली. विशेष म्हणजे यासाठी लोकशाही पद्धतीने मतदान करण्यात येऊन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव ॲड. अद्वैत चव्हाण यांनी काम पाहिले.

अशी आहे नूतन कार्यकारिणी

अध्यक्ष दत्तात्रय नाईकनवरे, उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सचिव अॅड. अद्वैत चव्हाण, सहसचिव अनुप फंड, कोषाध्यक्ष सैफन शेख, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनायक शिंदे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.प्रवीण सेलूकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव गोपाल वाढे, महाराष्ट्र राज्य संघटक महादेव हरणे, आनंद भिमटे, महिला प्रतिनिधी कु.श्रुती कथे (निमंत्रित सदस्य) अशी कायकारिणीची निवड केली आहे.

जिल्हाध्यक्ष, तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी यांच्याशी साधावा संपर्क

महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन संघटनेच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष व तालुका पदाधिकाऱ्यांची नेमणूक करावयाची असून डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणारे पत्रकार, प्रतिनिधी व संपादकांनी महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्तात्रय नाईकनवरे (मोबाईल ९४२१०७५९३१), उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर (मोबाईल ९८२३६४८१८१), सचिव ॲड. अद्वैत चव्हाण (मोबाईल ९८२२६६८७८६), सहसचिव अनुप फंड (मोबाईल ८९५६९१०७०७), कोषाध्यक्ष सैफन शेख (मोबाईल ९४८३२२२१११), महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनायक शिंदे (मोबाईल ९५०३३९२७३७), प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रवीण कुमार सेलूकर (मोबाईल ९८६००८३५७३) व महाराष्ट्र प्रदेश सचिव गोपाल वाढे (मोबाईल ८३०८४४४९३४), संचालक महादेव हरणे (मोबाईल ९१३००९०४४४) आणि आनंद भिमटे (मोबाईल ७७४५८३५३२६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *