अमळनेर (प्रतिनिधी) लॉकडाऊन आणि त्यानंतरही वीजवितरण कंपनी नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिले पाठली आहे. शासनाने अश्वासन देऊनही ती कमी केली नाही किंवा त्यावर उपयोजना केल्या नाहीत, म्हणून नाकर्त्या सरकार्या विरोधात भाजपाने सोमवारी कपिलेश्वर मंदिरावर वीजबिलांची होळी करून निषेध आंदोलन केले.
देशाबरोबर जगावर कोरोना महामारीचे संकट अजूनही दूर झालेली नाही. तसेच यामुळे जनतेता कामधंदा बंद पडला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा संकटात राज्य सरकारने मदत तर अजीबात केलीच नाही, उलट अव्वाच्या सव्वा विजबिले जनतेला पाठवली. कामधंदा नसल्याने सर्व सामान्य जनेतेला पाठवलेले हे विजबील म्हणजे फारच मोठे संकट आहे. ही बिले पूर्ण माफ करण्यात यावेत म्हणून माजी आमदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वात कपिलेश्वर महादेव मंदिर, नीम (कपीलेश्वर ) येथे वीजबिवाल माफ न करणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध नोंदवून विजबिलांची होळी केली. याप्रसंगी शहराध्यक्ष उमेश वाल्हे, पंचायत समिती सभापती रेखा पाटील, सरचिटणीस जिजाबराव पाटील, विजय राजपूत, राहुल पाटील व बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.