एकही कोरोना रुग्ण न आढळल्याने सोमवार ठरला दिलासा देणारा वार

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यासाठी सोमवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. या दिवशी एकही कोरोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. मात्र तरीही कोरोनाचे संकट टळले नसून नागरिकांनी विनाकरण आणि विनामास्क घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
अमळनेर तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग वाढू लागत असतानाच सोमवारी शहरासह ग्रामीण भागातील  आलेल्या अहवालात एकही रुग्ण बाधित आढळला नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. तर तर आतापर्यंत तालुक्यात ४४६९ रुग्ण बाधित झाले असून १०३ जणांचा बळी गेला आहे. यात अमळनेरच्या १०० आणि बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. तसेच सोमवारी ४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ४३५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच सध्या १८ रुग्ण उपचार घेत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *