सर्व नराधमांना फाशीची शिक्षा होण्यसाठी पाठपुरावा करणार
अमळनेर (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील टोळी येथील अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांना काँग्रेसच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन करुन धीर दिला. तसेच या घटनेचा निषेध करून नराधमांना फाशीची शिक्षा होऊन न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या प्रकरणाची कठोर चौकशी होऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. याबाबत डीवायएसपी अमळनेर, पारोळा पोलीस निरीक्षक यांना जळगाव महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, महिला काँग्रेस प्रदेश सचिव अनिताताई खरारे, अनुसूचित जाती विभाग महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रतिभा मोरे, अनु.जाती विभाग प्रदेश काँग्रेस प्रदेश समन्वयक भगवान मेढे, पारोळा काँग्रेस तालुकाध्यक्ष पिरणकुमार अनुष्ठान व महिला वर्ग यांनी निवेदन दिले.