टोळी येथील तरुणीवर अत्याचारातील आरोपिला चार दिवस पोलिस कोठडी

अमळनेर (प्रतिनिधी)  पारोळा तालुक्यातील टोळी येथील तरुणीवर अत्याचार करून तिला विष पाजून मारल्याप्रकरणात संशयित शिवानंद उर्फ दादू शालिक पवार याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला शुक्रवारी अमळनेर येथील न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांना त्याच्याकडून गुन्ह्याची अधिक उकल यात करता येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील टोळी येथील पीडित तरुणीचा ७ रोजी मृत्यू झाला होता. त्यात आरोपी शिवानंद पवार व त्याच्या मित्रांविरुद्ध बलात्कार, खून व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  डीवायएसपी राकेश जाधव यांनी शिवानंद यास १९ रोजी अटक केली होती. त्याला अमळनेर येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील अॅड किशोर बागुल यांनी आरोपीची शारीरिक तपासणी करणे आवश्यक आहे, गुन्ह्यातील मोबाईल हस्तगत करणे, घटनास्थळ दाखवणे, विषाची बाटली कोणाकडून घेतली, सोबत आणखी कोण तरुण होते का ? आणखी काही आरोपी होते का, याची माहिती तपासात जाणून घेण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली असता न्या. व्ही. आर. जोशी यांनी त्याला २३ नोव्हेंबरपर्यंत चार दिवसांची कोठडी सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *