अमळनेर (प्रतिनिधी) सुप्रीम कोर्टाने आदिवासी कुटुंबांना रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याच्या आदेशानुसार अमळनेर तहसील कार्यालयातर्फे रविवारी २२ नोव्हेंबर रोजी सुमारे ५०० आदिवासी कुटुंबांना रेशनकार्ड वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सानेगुरुजी विद्यालयात मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार असून वंचितांना त्यांच्या हक्काचे रेशन आणि इतर शासकीय सवलती मिळण्यास मदत होणार आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशनुसार आदिवासी कुटुंबांना रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याबाबत निकाल दिलेला आहे. त्यानुसार लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील १५४ गावात वंचित आदिवासी कुटुंबांना विनामुल्य रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याबाबत नियोजनानुसार गावा गावात आदिवासी कुटुंबाचे सर्वेक्षण करून फार्म भरण्याचे काम चालू आहे. त्या पैकी शुक्रवारी दापोरी, लडगाव, चोपडाई, नंदगाव, जानवे, निसर्डी, मांडळ, ताडेपुरा अमळनेर, कुर्हे खु , पातोंडा येथील सुमारे ५१ लाभार्थ्यांचे रेशनकार्ड मिळावे यासाठी लोक संघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक पन्नालाल मावळे, शांताराम सोनवणे, अविनाश पवार,नितीन साळूंके, किशोर सोनवणे, हंसराज भिल, सुदाम सोनवणे, गणेश चव्हाण, हंसराज भिल, महेश आहिरे, उमेश मोरे, राहूल मोरे, भैया भिल, विशाल मालचे, विजय सोनवणे, विशाल भाव, मंगलु सोनवणे, हेमंत दाभाडे यांनी विहित नमुन्यात भरलेले अर्ज पुरवठा विभागाचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या ताब्यात दिले.