मंगरुळ ग्रामस्थांनी कोरोना जागृती, स्वछता अन् साक्षरतेची घेतली थपथ

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) अंतर्गत कार्यक्रम

अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील मंगरूळ गावात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) जळगाव अंतर्गत स्वछ भारत मिशन स्वच्छता व साक्षरता अभियान अंतर्गत कार्यक्रम झाला. या वेळी गावातील बचत गटातील महिला व गावातील नागरिकांनी कोरोना जागृती स्वछता, साक्षरता ,बाबतीत शपथ घेतली.
नाबार्ड बँकेचे जळगाव जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, गट विकास अधिकारी संदीप वायाळ, शिरपूर पीपल बँक जळगावच्या व्यवस्थापिका दप्तरी, यशदाचे ट्रेनर भटू पाटील, जिल्हा समन्वयक नितीन नेरकर, प्रा. संदीप पाटील , ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, किशोर पाटील, सोसायटीचे सचिव अमोल पाटील, आनंदा पाटील, व्ही. टी. पाटील, कृषी सखी सुनंदा पाटील, रेखा घोलप, धनश्री पाटील, कविता पाटील, गावातील बचत गटाच्या महिला व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी नाबार्डच्या माध्यमातून विनोद ढोले व त्याच्या सहकार्यांनी पथनाट्यद्वारे स्वच्छता, आरोग्य, साक्षरता व्यसनमुक्ती व बेरोजगारी यावर पाथनाट्य सादर केले. तसेच गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी कोरोना बाबतीत घेवायची काळजी, स्वछता, वृक्षारोपण व शौचालय व नरेगा या संदर्भात मार्गदर्शन केले. नाबार्डचे व्यवस्थापकांनी स्वछता व साक्षरता आणि बचत गटांना उद्योगासाठी कर्ज पुरवठा व रोजगार या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले. आभार प्रा. संदीप पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *