अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामीण आणि शहरातील आलेल्या अहवालात शुक्रवारी पुन्हा चार रुग्ण पॉझिटिव्ही आढळून आले. त्यात दोन्ही रुग्ण अमळनेर शहरातील आहेत. दिवाळी संपल्यानंतर आता कोरोना रुग्ण संख्या हळूहळू वाढू लागल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्राशासनातर्फे आणि आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
अमळनेर तालुक्यात कोरोनाने संसर्गाने दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात सलग चार ते पाच दिवस एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. त्यानंतर आता दिवाळी संपल्याने काही रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात तब्बल ४ नवीन रुग्ण आहे त्यात दोन रुग्ण हे नवीन तर दोन रुग्ण हे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आहे. तर शहरात एक रुग्णाचा समावेश आहे. तर एकूण रुग्ण संख्या ही ४४६९ ऐवढी झाली आहे. तसेच शुक्रवारी २ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर आतापर्यंत ४३४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तसेच कोरोनाने आतापर्यंत १०३ जणांचा बळी घेतला आहे. तर २२ रुग्णांवर सध्या कोरोना हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.