दिनांक ५, ६, ७ डिसेंबरला व्हर्च्युअल रुपात कार्यक्रमाचे नियोजन
अमळनेर (प्रतिनिधी) सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने या वर्षीचा ७३ वा वार्षिक निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रूपात दिनांक ५, ६ व ७ डिसेंबर, २०२० रोजी आयोजित करण्यात आला आहे. जगभरातील लक्षावधी भाविक-भक्तगण घरबसल्या ऑनलाईनच्या माध्यमातून हा समागम पाहू शकणार आहेत.
या संपूर्ण समागमाच्या कार्यक्रमाचे प्रसारण मिशनच्या वेबसाईटवर दिनांक ५, ६ व ७ डिसेंबर, २०२० रोजी केले जाणार आहे. या व्यतिरिक्त हा समागम संस्कार टी.व्ही. चॅनल वर तिन्ही दिवशी सायंकाळी ५:३० ते रात्री ९:०० या वेळात प्रसारित करण्यात येईल. कोविड-१९ च्या वैश्विक महामारीच्या काळात संत निरंकारी मिशनने सरकारकडून दिलेल्या निर्देशांचे पालन करत सामाजिक अंतर ठेवणे व मास्कचा वापर करणे (मास्क वापरा निरंतर, ठेवा सामाजिक अंतर) समाजकल्याणाचे अनेक उपक्रम राबवले. यामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन, गरजुंना जिवनावश्यक वस्तुंचे (रेशन) वाटप, निरंकारी सत्संग भवन क्वारंटाईन सेन्टर म्हणून प्रदान करणे इत्यादी विविध सेवांचा समावेश आहे. देश-विदेशातील निरंकारी भक्तगण या व्हर्च्युअल समागमाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत.