कलाली येथे मारवड पोलिसांनी धाड टाकून दोन गावठी हातभट्टी दारूचे अड्डे केले उद्ध्वस्त

अमळनेर (प्रतिनिधी) मारवड पोलिसांनी धाड टाकून  कलाली येथे शेतात सुरू असलेल्या दोन गावठी हातभट्टी दारूचे अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले. यात सुमारे ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  सहायक पोलिस निरीक्षक राहुल फुला यांना मिळालेल्या माहिती वरून कलाली येथील ज्ञानेश्वर सुखदेव कोळी हा त्याच्या भावाच्या नावे तापी नदी काठी असलेल्या गट न २३० या शेतात हातभट्टी द्वारे गावठी दारू तयार करतांना आढळून आला असून मारवड पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सुनील तेली यांनी दिलेल्या फिर्यादी वरून मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कैलास सुखदेव कोळी हा कलाली येथील गट न २३० लोंढे नाल्याशेजारील शेतात हातभट्टी वरील दारू तयार करताना आढळून आला असून त्याच्या कडून मारवड  पोलिसांनी सुमारे ४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याबाबत फिरोज बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *