✅ ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२० मधील काही महत्त्वपुर्ण नियुक्त्या (भाग-०२)
???? जे व्यंकटरामु : सीईओ , इंडिया पोस्ट पेमेंट बँक
???? एम राजेश्वर राव : आरबीआय डेप्युटी गव्हर्नर
???? विजय वर्धन : मुख्य आयुक्त (हरियाणा)
???? शेख नवाफ अल-अहमद अल-सबाह : आमीर , कतार
???? अलपन बंडोपाध्याय : मुख्य आयुक्त (पश्चिम बंगाल)
???? एच के द्विवेदी : गृह आयुक्त , (पश्चिम बंगाल)
???? मनोज पंत : वित्त आयुक्त (पश्चिम बंगाल)
???? एस सी शर्मा : अध्यक्ष , राष्ट्रीय मेडिकल आयोग
???? आर के वत्स : सेक्रेटरी , राष्ट्रीय मेडिकल आयोग
???? मोहम्मद हुसेन : पंतप्रधान , सोमालिया
???? एस के खरे , एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर , एडीबी
???? राजेश खुल्लर , एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर , वल्ड बँक
???? परेश रावल , अध्यक्ष , नँशनल स्कुल ऑफ ड्रामा
???? सी पार्थ सारथी , निवडणूक आयुक्त (तेलंगणा)
???? अरुण श्याम , अँडव्होकेट जनरल (कर्नाटक) .
✅✅ कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना . ✅✅ #National
???? कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी यासंबंधी आदेश दिला आहे.
???? मराठा विकास प्राधिकरणासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली असून निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
???? तसेच कर्नाटक राज्यात तसंच खासकरुन सीमारेषेवरील परिसरात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
???? तर अधिकृत आदेशानुसार, गेल्या कित्येक दशकांपासून कर्नाटक राज्यात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजाच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
???? मराठा विकास प्राधिकरणाचं मुख्य लक्ष्य समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक विकासाकडे असणार आहे.
☑️ एकूण वातावरणाच्या सुमारे ९७% वातावरण समुद्र सपाटीपासून सुमारे २९ कि.मी. उंची पर्यंतच सामावलेले आहे.
☑️ भूपृष्ठापासून सुमारे ८० कि.मी. उंची पर्यंतच्या भागात वातावरणातील वायूंचे प्रमाण सर्वत्र सारखे असून या आवरणातील रासायनिक घटना सर्वत्र समान असते म्हणून या थराला समावरणाचा थर म्हणतात.
☑️ समावरणाच्या थरात वातावरणातील एकूण वायूंपैकी नायट्रोजन व ऑक्सिजन यांचे प्राबल्य सर्वात जास्त म्हणजे ९९.०३% इतके असते. तर भूपृष्ठापासून सुमारे ८० कि.मी. च्या वर वातावरणाच्या भागाला विषमावरण म्हणतात.
☑️ पृथ्वीच्या संपुर्ण वातावरणाच्या वस्तुमानापैकी 99% वस्तुमान हे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या पहिल्या 30 किलोमीटर च्या आत केंद्रित आहे.
☑️ तापमान व इतर घटकांचा विचार करून वातावरणाचे खालील स्तरांमध्ये विभाजन केले जाते.
1) तपांबर (Troposphere)
2) स्थितांबर (Stratosphere)
3) दलांबर/आयनांबर) (Ionosphere)
4) बाह्यम्बर (Exosphere)
✅✅ बांगलादेशी किशोर सदात रहमानला आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्काराने (२०२०) सन्मानित . ✅✅ #Prize
???? बांगलादेशी किशोर सदात रहमानला किशोरांच्या सायबर गुंडगिरी थांबविण्याच्या कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
???? शुक्रवारी हा पुरस्कार नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफजई यांनी नेदरलँड्स येथे एका समारंभात दिला.
???? मुलांच्या हक्कांसाठी धैर्याने लढणाऱ्या मुलाला आंतरराष्ट्रीय बाल हक्क संस्था ‘किड्सराईट्स’ या संस्थेने हे पुरस्कार प्रदान केले.
???? सादत रहमान यांची ४२ देशांमधून १४२ अर्जदारांपैकी निवड झाली. सायबर गुंडगिरीचे पीडित किशोरवयीन मुलांना मदत करण्यासाठी त्याने ‘सायबर टीन्स’ हे अॅन्टी-सायबर गुंडगिरी अॅप तयार केले आहे. अॅप इंटरनेट सुरक्षिततेबद्दल तरुणांना माहिती प्रदान करते. तसेच सायबर धमकावणीचा गोपनीयतेने अहवाल देण्यासाठी त्यांना एक चॅनेल देखील प्रदान करते.
???? सादत यांनी सायबर तज्ञ, समाजसेवक आणि पोलिस यांना एकत्र आणण्यासाठी एक संघटना देखील तयार केली. ते सायबर गुंडगिरीशी संबंधित मुद्द्यांविषयी जनजागृती करण्यासाठी सेमिनार व मीटिंगच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालयातील तरुणांना संबोधित करीत आहेत.
???? किड्सराईट्स संस्थेच्या मते, अॅपने सायबर गुंडगिरीद्वारे बळी पडलेल्या 300 हून अधिक जणांना मदत केली आहे. मानसिक आरोग्य नने पीडित लोकांना देखील याने आधार दिला आहे. आपल्या क्षेत्रातील शाळांमध्येही त्यांनी सायबर क्लब तयार केले आहेत जिथे तरुणांना डिजिटल साक्षरतेचे शिक्षण दिले जाते.
???? मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या अध्यक्षतेखाली २००५ च्या रोममधील नोबेल पीस पुरस्कार विजेत्यांच्या जागतिक परिषदेच्या वेळी किड्सराईट्सच्या हस्ते पहिले बक्षीस देण्यात आले. त्यानंतर, नोबेल पीस पुरस्कार विजेते दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करतात.
???? उत्कृष्ट क्षमता असलेल्या तरुणांना ओळखून, त्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी व्यासपीठ प्रदान करते. पुरस्कार विजेत्यास विद्यापीठाच्या पदवीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. किड्सराईट्सने त्यांच्या देशातील विजेत्याच्या क्षेत्राशी जवळून जोडलेल्या प्रकल्पांमध्ये 1 लाख युरोचा प्रकल्प निधी गुंतविला जातो.
✅✅ मर्सिडीझच्या लुईस हॅमिल्टनला विक्रमी सातवे जगज्जेतेपद . ✅✅ #Sports #Formula1
???? मर्सिडीझच्या लुइस हॅमिल्टनने रविवारी ओलसर अशा ट्रॅकवर निर्विवाद वर्चस्व गाजवत तुर्कीश ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीचे जेतेपद पटकावले आणि सातव्यांदा जगज्जेता होण्याचा मान मिळवला.
???? या कामगिरीसह त्याने मायकेल शूमाकर याच्या सात जगज्जेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी साधली. ✅ #IMP
???? तर या मोसमातील 10वी शर्यत जिंकत हॅमिल्टनने कारकीर्दीत 94 जेतेपदे पटकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
???? 2013 मध्ये मर्सिडीझ संघातील शूमाकरची जागा घेतल्यानंतर हॅमिल्टनने सहा जगज्जेतेपदे मिळवली आहेत. मॅकलॅरेनकडून खेळताना त्याने 2008 मध्ये जगज्जेतेपद पटकावले होते.
???????? दिनविशेष ????????
#DinVishesh
???????? १८ नोव्हेंबर :- घटना ????????
१४९३: ख्रिस्तोफर कोलंबस यांनी पोर्तो रिको हे बेट पहिल्यांदा पाहीले.
१८०९: फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.
१८८२: अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले.
१९०५: लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.
१९१८: लाटव्हियाने आपण रशियापासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१९२८: वॉल्ट डिस्ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म.
१९३३: प्रभात चा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला.
१९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.
१९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले.
१९६३: पहल्या पुश-बटण टेलिफोनची सेवा चालू झाली.
१९९२: ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९३: दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.
२०१५: टेनिसपटू रॉजर फेडरर ने नोव्हाक जोकोविच ला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूर लंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.
२०१५: भारतीयशटलर पी. व्ही. सिंधू ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिना मारीन हिने पहिल्याच फेरीत पराभूत केले.
२०१५: भारतीयशटलर किदाम्बी श्रीकांत ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या तियान हुवेई ने पहिल्याच फेरीत पराभूत केले.
२०१५: भारतीयशटलर जयराम चा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या चेन लोंग ने पहिल्याच फेरीत पराभूत केले.
२०१५: भारतीय महिला दुहेरीशटलर जोडी ज्वाला व अश्विनी यांचा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव.
२०१५: भारतीय स्क़्वाॅश खेळाडू सौरव घोशाल चा बेलिबी येथे जागतिक स्क़्वाॅश स्पर्धेत ईंग्लंडच्या जेम्स विल्यस्ट्राप ने दुसऱ्या फेरीत पराभूत केले.
???????? १८ नोव्हेंबर :- जन्म ????????
१८९८: भारताचा अतिप्राचीन इतिहास प्रबोध चंद्र बागची यांचा जन्म.
१९०१: चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. शांताराम यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९०)
१९०६: मिनी कार चे निर्माते अॅलेक इझिगोनिस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८८)
१९०९: कॅपिटल रिकॉर्ड्स चे सहसंस्थापक जॉनी मर्सर यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७६)
१९१०: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९६५)
१९३१: हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य श्रीकांत वर्मा यांचा जन्म.
१९४५: श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख महिंदा राजपक्षे यांचा जन्म.
???????? १८ नोव्हेंबर :- निधन ????????
१७७२: मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव पेशवे यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १७४५)
१८३०: इल्युमिनॅटि चे संस्थापक अॅडम वाईशप्त यांचे निधन. (जन्म: ६ फेब्रुवारी १७४८)
१९३६: भारताचे वकील व राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८७२)
१९६२: अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक नील्स बोहर यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १८८५)
१९९३: लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद यांचे निधन.
१९९६: समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई यांचे निधन.
१९९८: भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९३६)
१९९८: सातार्याच्या सामाजिक समाजसेवक रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले यांचे निधन.
१९९९: स्वातंत्र्यसैनिक रामसिंह रतनसिंह परदेशी यांचे निधन.
२००१: नाडेप कंपोस्ट खताचे जनक नारायण देवराव पांढरीपांडे तथा नाडेप काका यांचे निधन.
२००६: मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९१७)
२०१३: भारतीय संगीतकार एस. आर. डी. वैद्यनाथन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९२९)
२०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते सी. रुधराय्या यांचे निधन).
✅✅ अरबी समुद्रात मलबार नौदल कवायती सुरू. ✅✅ #Defence #Exercise
???? भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपान यांच्या नौदलांनी मंगळवारी उत्तर अरबी समुद्रात मलबार नौदल कवायती सुरू केल्या.
???? यात दोन विमानवाहू जहाजांसह अनेक आघाडीची लढाऊ जहाजे, पाणबुडय़ा आणि सागरी टेहळणी विमाने सहभागी झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
???? चार दिवसांच्या या कवायतीचे प्रमुख आकर्षण भारतीय नौदलाच्या विक्रमादित्य कॅरियर बॅटल ग्रुप आणि अमेरिकी नौदलाच्या निमित्झ स्ट्राईक ग्रुप यांचा सहभाग आहे.
???? यूएसएस निमित्झ हे जगातील सर्वात मोठे लढाऊ जहाज आहे.
???? मलबार कवायतींचा पहिला टप्पा ३ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात पार पडला. त्यात पाणबुडीरोधक आणि हवाई युद्धरोधक मोहिमांसह अनेक गुंतागुंतीच्या कवायती करण्यात आल्या.
???? ऑस्ट्रेलियन नौदलाने त्यांच्या एचएमएएस बलार्ट हे अंकाझ श्रेणीचे लढाऊ जहाज तैनात केले असून, जपानी नौदलाने त्यांची आघाडीची विनाशिका जेएस मुरासामे या कवायतींसाठी पाठवली आहे.
???? भारत व चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये सीमेवर सहा महिन्यांपासून तणाव असतानाच्या काळातच ही मोठी कवायत होत आहे.
???? ‘क्वाड’ आघाडीचे भाग असलेल्या ४ देशांच्या नौदलांमध्ये गुंतागुंतीच्या मोहिमा समन्वयाने पार पाडणे हा त्यांचा उद्देश आहे.
✍️जिल्हा निर्मिती व त्यावेळचे मुख्यमंत्री
✍️रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग
औरंगाबाद मधून जालना.
CM=A.R. अंतुले(१ मे १९८०)
✍️उस्मानाबाद मधून लातूर (१६ ऑगस्ट १९८२ )
लगेच १० दिवसानंतर २६ ऑगस्ट १९८२ चंद्रपूर मधून गडचिरोली
CM = बाबासाहेब भोसले
✍️धुळे मधून नंदुरबार (१जुलै१९९८) त्याच दिवशी अकोलामधून वाशिम CM=मनोहर जोशी
✍️भंडारा मधून गोंदिया व त्याच दिवशी परभणी मधून हिंगोली (१ मे १९९९)
CM= नारायण राने
✍️(४ oct १९९०) मुंबई शहर मधून मुंबई उपनगर
CM =शरद पवार
✍️२०१४ ठाणे मधून पालघर
CM =पृथ्वीराज चव्हाण