अमळनेर(प्रतिनिधी) लघुशंकेसाठी गेलेल्या एकाला चौघांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता भारत सायकल मार्ट जवळ घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुणाल देविदास घोगले हा १६ रोजी रात्री भारत सायकल मार्ट जवळील शौचालयाजवळ लघुशंकेला गेला असताना केसर (पूर्ण नाव माहीत नाही), इरफान (भंगार वाल्याचा मुलगा) , आबीदचा भाऊ , व तौफिक (जडी बुटीवाला) यांनी त्याला हटकले आणि जातीवाचक शिवीगाळ केली. त्याचवेळी इरफानने त्याच्या पाठीवर सायकल मारून दुखापत केली. कुणाल याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला चौघाविरुद्ध ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास डीवायएसपी राकेश जाधव करीत आहेत.