अमळनेर (प्रतिनिधी`) गांधली रस्त्यावरील शेतातून दोन बैलजोड्या लंपास केल्याची घटना दि. १७ नोव्हेंबर रोजी गांधली जळोद रस्त्यावरील हॉटेल पांडुरंग समोरील शेतात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर शहर व तालुक्यात शेतकऱ्यांचे पशुधन चोरी होण्याच्या घटना वाढल्या असून यामुळे शेतकरी बांधवाना मोठा आर्थिक फटका बसत आहे. शहरातील सानेनगर येथिल शेतकरी भीका वामन पाटील यांच्या मालकीच्या दोन बैल जोड्या म्हणजेच चार जनावरे दि १७ रोजी गांधली जळोद रस्त्यावरील हॉटेल पांडुरंग समोरील शेतातून चोरीस गेले आहे. यामुळे सदर शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख २० हजार रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. चोरीस गेलेले तीन बैल पांढऱ्या रंगाचे आणि एक बैल लाल रंगाचा आहे. चोरीबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी गुरे चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे.