शिवसेना उपनेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश
अमळनेर(प्रतिनिधी) गावाच्या विकासासाठी शिवधनुष्य हाती घेत तालुक्यांतील आदर्श गाव सुदंरपट्टीचे लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी गावाचा विकास हाच ध्यास घेतल्याने अनेक वर्षे सरपंचपद भूषवले आहे. म्हणून पुन्हा कामाला गती देण्यासाठी त्यांनी शिवधनुष्य हाती पेलले आहे.
शिवसेना उपनेते तथा जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाळधी येथे हा प्रवेश सोहळा पार पडला. यात सरपंच सुरेश पाटील यांनी भगवा फटका घालून अमळनेर शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ ,अमळनेर तालुकाप्रमुख विजू मास्तर, शहरप्रमुख संजय पाटील उपस्थित होते.
सुरेश पाटील हे अमळनेर तालुका सरपंच संघाचे तालुका अध्यक्ष असून सुंदरपट्टी ग्रामपंचायतीत त्यांचे पूर्ण पॅनल विजयी झालेले आहे. लवकरचं त्यांच्यासोबत तालुक्यांतील अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व विविध सोसायटी सदस्य मोठ्या कार्यक्रमाद्वारे प्रवेश घेणार आहेत. त्यांच्या प्रवेशाने ग्रामीण भागात शिवसेना वाढीसाठी फायदेशीर ठरणार आहे, अमळनेर शिवसेना पदाधिकारिनी त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले आहे. तर सुरेश पाटील यांनी संपूर्ण तालुका भगवामय करण्याचा निश्चय केला आहे.