ज्वारीला २६२० तर मकाला १८५०, बाजरीला २१५० चा हमीभाव जाहीर

शेतकी संघाच्या आवारात शासकीय भरड धान्य खरेदीस सुरुवात,

अमळनेर(प्रतिनिधी)ज्वारीला २६२० तर मकाला १८५०, बाजरीला २१५० चा हमीभाव जाहीर करण्यात आला असून मंगळवारी  धुळे रस्त्यावरील शेतकी संघाच्या जीनमध्ये शासकीय शासकीय भरड धान्य केंद्र शुभारंभ करण्यात आला.
आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. काटापूजन करून ज्वारी मका बाजरी खरेदीला सुरुवात झाली.  माल आणलेल्या हिंमत चिमणराव पाटील निंभोरा या शेतकऱ्याचा टोपी रुमाल नारळ वाढवून सत्कार करण्यात आला. यावेळी रविंद्र पाटील, दीपक पाटील, सचिन बेहरे, नायब तहसीलदार योगेश पवार, पुरवठा अव्वल कारकून नाना पाटील, हिशोब अव्वल कारकून अशोक ठाकरे, पुरवठा निरीक्षक साळुंखे, सहकार अधिकारी सुनील महाजन, शेतकी संघ प्रशासक गणेश महाजन, विक्रीला आणणारे निंभोरा येथील प्रथम शेतकरी हिंमत चिमणराव पाटील, शेतकी संघ व्यस्थापक संजय पाटील, शेतकी संघ कर्मचारी सुभाष पाटील, भटू पाटील, अरुण पाटील, भिकन पवार, डीएमओ संतोष पाटील आदी उपस्थित होते.

सुका माल आणि प्रत चांगली असल्यास शेतकर्‍यांना मिळू शकतो हमीभाव

सुका माल आणि प्रत चांगली असल्यास हमीभाव मिळू शकतो त्यासाठी शेतकर्यांना हे केंद्र चांगला भाव देऊ शकते. केंद्रावर शेतकी संघातर्फे आवश्यक ती सुविधा पुरविण्यात आलेली असून दोन कर्मचारीही नियुक्त करण्यात आलेले आहेत. ओला मका वाळवणीसाठीही सोय करण्यात आलेली असून तालुका खरेदी विक्री संघाचा कर्मचारीही नियमित केंद्रावर येत राहतील. पण केंद्रावरील सर्व व्यवहार पाहण्यासाठी आवश्यक असलेला तहसील कार्यालयाने नियुक्त केलेला कर्मचारी शासकीय कर्मचारी केंद्रावर उपस्थित राहतील. त्यांची सही असल्याशिवाय खरेदी करता येत नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *