अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील कोरोनाच आलेख घसरत असला तरी काही ठिकाणी अजूनही रुग्ण आढळून येत आहे. मंगळवारी आलेल्या अहवालातही १ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
अमळनेर तालुक्यात कोरोनाने संसर्गाने दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात सलग चार ते पाच दिवस एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. त्यानंतर मात्र काही रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिवाळीचा सण असला तरी खरेदी करताना गर्दी करू नये असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तर मंगळवारी आलेल्या अहवालात आढळलेला १ नवीन रुग्ण तो ग्रामीण भागातील आहे. तर एकूण रुग्ण संख्या ही ४४५९ ऐवढी झाली आहे. मंगळवारी एकाही रुग्णाने कोरोनावर मात केली नाही. तर आतापर्यंत ४३४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तसेच कोरोनाने आतापर्यंत १०३ जणांचा बळी घेतला आहे.