अमळनेर (प्रतिनिधी)शहरासह ग्रामीण भागात पाचव्या दिवशी मंगळवारी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. सलग चार दिवस आलेल्या अहवालात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. तसेच मंगळवारी ३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ७ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अमळनेर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख चांगलाच घसरू लागला आहे. संसर्ग होण्याचे प्रमाणही शून्यावर आले आहे. तर मंगळवारी आलेल्या अहवालात ग्रामीण भागातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. तसेच एकाचाही मृत्यू झाला नसून आतापर्यंत १०३ जणांचा बळी गेला आहे. तसेच तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४४४२ वर पोहोचली आहे. ३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ४३३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या कोविड रुग्णालयात ०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच रुग्ण संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.