पेट्रोल पंपाच्या टाकीतून दीड लाखाचे २ हजार लीटर डिझेल चोरून चोरटे सुसाट

अमळनेर तालुक्यातील गलवाडे रस्त्यावरील साई पेट्रोल पंपावरील घटना

अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील गलवाडे रस्त्यावरील साई पेट्रोल पंपाच्या टाकीतून १ लाख ६० हजार रुपये किमतीचे दोन हजार लिटर डिझेल दि. ७ नोव्हेंबर रोजी रात्री ११:५५ ते दि. ८ रोजी सकाळी ११:४५ वाजेच्या दरम्यान चोरीस गेल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   याबाबत अधिक माहिती अशी की, धनंजय बडगुजर यांच्या मालकीचा गलवाडे रस्त्यावर साई पेट्रोल पंप आहे. दि. ८ रोजी सकाळी ११:४५ वाजता मॅनेजर आशिष साळुंखे, कामगार सतीश बागुल, प्रदीप पाटील यांनी डिझेल टाकीत डिझेल चेक केले असता या टाकीत २ हजार लिटर डिझेल लंपास आल्याचे दिसून आले. तसेच टाकीचे झाकण कापून फेकून दिल्याचे आढळले. यानंतर मालक बडगुजर यांनी खात्री केली असता एक लाख साठ हजार रुपये किमतीचे दोन हजार लिटर डिझेल दि. ७ रोजी रात्री ११:५५ ते दि. ८ रोजी सकाळी ११:४५ वाजेच्या दरम्यान चोरीस गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी धनंजय बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी  कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स. पो. नि. राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. रोहिदास जाधव, भास्कर चव्हाण व सचिन निकम हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *