लक्झरी बसमध्ये बसून पळ काढतांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील सुंदरपट्टीच्या सरपंचांची दुचाकी चोरणार्या कसाली मोहल्ल्यातील १९ वर्षीय चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याने
धुळ्यात एजंटला दुचाकी विकली होती. विकणाऱ्या अमळनेरच्या तरुणाला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील सुंदरपट्टीचे सरपंच सुरेश पाटील यांची दुचाकी चोरीस गेली होती. ही दुचाकी अमळनेर येथील कसाली मोहल्ल्यातील जाफरखा शरीफखा मेवाती या (वय १९) तरुणाने चोरून धुळे येथील एका एजंटला १५ हजार रुपयात विक्री केली होती. ही माहिती गोपनीयचे डॉ. शरद पाटील याना मिळल्यावरून त्यांनी पोलीस निरीक्षक याना सांगितली. राजेश चव्हाण ,दीपक विसावे , भटूसिंग तोमर , संजय पाटील ,दीपक माळी , रवी पाटील , भूषण बाविस्कर , हितेश चिंचोरे या पथकाने त्याला पकडण्यासाठी धाव घेतली असता चोरट्याने घरी भिवंडी जात असल्याचे सांगून लक्झरी बसमध्ये बसून पळ काढला. पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले असून धुळ्याचे दलाल देखील पकडण्यात येणार आहेत. यामुळे अनेक दुचाकी चोरी उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपीला अटक केली असून तपास राजेश चव्हाण करीत आहेत.