अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी सबसिडीचे हरभरा बियाणे वाटप

आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते वाटप, पुन्हा १३० क्विंटल बियाणे झाले मंजूर

अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी सबसिडीचा हरभरा बियाण्याचे वितरण  आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. येथील धरतीधन या कृषी केंद्रावर बियाणे वाटप करण्यात आले.
अमळनेर तालुक्याला आतापर्यंत १६२.५० क्विंटल बियाणे प्राप्त झाले असून शासनाने शेतकऱ्यांना सबसिडीने हे बियाणे उपलब्ध केले आहे. यंदा जास्तीत जास्त रब्बी पीक घेता येईल याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी आमदार अनिल पाटील यांची भेट घेऊन वाढीव बियाणे मागवण्याची मागणी केली होती ती बाब पाहून ५ नोव्हेंबर रोजी आमदार अनिल पाटील यांना पत्र पाठवून शेतकऱ्यांना अनुदानातून वाढीव बियाणे १३० क्विंटल हरभरा बियाणे लक्षांक मंजूर करण्याची  मागणी केली होती.
त्यानुसार पुन्हा १३० क्विंटल बियाणे तालुक्यासाठी जिल्हा कृषी विभागाने मंजूर केले असून काही दिवसात सर्व शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेता यावा यासाठी बियाणे उपलब्ध होईल. यामुळे आमदार अनिल पाटील यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.

हे होते हरभरा वाटप प्रसंगी उपस्थित

यावेळी अनुदानावर प्राप्त प्रमाणित हरभरा बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले, त्यावेळी शेतकरी गोपाळ गुलाब पाटील (रा.तांदळी) , तालुका कृषी अधिकारी भरत वारे, कृषि सेवा केंद्र बियाणे वितरक विजय जैन व इतर शेतकरी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *