आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शिघ्रनिदान व उपचार केंद्राचा शुभारंभ
अमळनेर (प्रतिनिधी)शहरातील ममता विद्यालय येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिघ्रनिदान व उपचार केंद्राचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग जळगाव अंतर्गत मतिमंद विद्यार्थी शिक्षण मंडळ संचलित ममता विद्यालय अमळनेर येथे ० ते ६ वर्षे वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शीघ्र निदान व उपचा केंद्राचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ मंगेश वैद्य तसेच संस्थेचे सदस्य डॉ. मिलिंद वैद्य व गिरीश कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश महाले, विशेष शिक्षिका कल्पना ठाकूर, राजेंद्र मोरे, विनोद पाटील, वैशाली राऊळ तसेच कला शिक्षक वासुदेव कोळी शिक्षकेतर कर्मचारी शांतीलाल पाटील, रामचंद्र धनगर, नामदेव जाधव, पंकज जाधव व कर्मचारी उपस्थित होते.