शासकीय योजनांसाठी होणारी फरपट थांबवण्यासाठी २० फेब्रुवारीपासून उपोषण

अमळनेर तालुका सरपंच संघटनेने प्रातांधिकाऱ्यांना दिला निवेदनाद्वारे इशारा

अमळनेर (प्रतिनिधी) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना,  खरीप २०१९ दष्काळ अनुदान निधी योजना, प्रत्येक गावात स्वतंत्र कॅम्प लावणे बाबत. अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर न पडणे बाबत व शेतकऱ्यांची होणारी फरपड, आर्थिक नुकसान, पिळवणक थांबण्यासाठी अमळनेर तालुका सरपंच संघटनेने २० फेब्रुवारीपासून उपोषणास बसण्याचा इशारा प्रातांधिकाऱ्यांना दिला आहे.
अमळनेर तालुका सरपंच संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले  आहे की, शासनाच्या योजने अंतर्गत केंद्र शासन, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने मिळणारा निधी शेतकऱ्यांनी अनेकवेळा आवश्यक कागदपत्र पुरवुन सुध्दा बँक अकाऊंट नंबर व आय.एफ.सी.कोड चुकीचा टाकणे, आधार नंबर चुकीचा टाकणे, नावाचा उल्लेख चुकीचा असने, इत्यादी बाबींचा घोळ मोठया प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रॉपर योजनांचा लाभ आपल्या कर्मचाऱ्यांच्या दिरंगाई व बेजबाबदार पणामुळे मिळत नाही. आपल्या कार्यालयात वारंवार चकरा मारुन शेतकरी हैराण झाले असून त्यांना कोणीच न्याय देत नाही. मुळातच शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून ही योजना राबविली असून आपल्या स्तरावरील बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा सुचना देवून देखील यात सुधारणा होत नसल्यामुळे संबंधित बेजबाबदार कर्मचाऱ्यांना निलंबित करावे.  शासनाच्या योजनाचा लाभ शेतकऱ्यांना तात्काळ मिळण्यासाठी  प्रत्येक गावात स्वतंत्र कॅम्प लावून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. येत्या ३ ते ४ दिवसात या सुधारणा न झाल्यास व आम्हाला योग्य तो निर्णय आपल्या कार्यालयात बोलवून अभिप्रेत न केल्यास आम्ही अमळनेर तालुका सरपंच संघटनेने  २० फेब्रुवारीपासून आपल्या कार्यालया समोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सरपंच अनिल शिवदास शिसोदे, शिवाजी पाटील,रामकृष्ण पाटील, शरद पाटील, सुरेश अर्जुन पाटील,उमेश साळुंखे, उज्वला पाटील, मिलिंद पाटील, अशोक पाटील, अनिता पाटील, सुमनबाई पाटील, दिनेश पाटील, केशरसिंग जाधव, रत्नाबाई पाटील, शिवतारे पाटील, जयपालसिंग गिरासे, उज्वला विजय, वैशाली पाटील, जितेंद्र पाटील, मधुकर पाटील, शशीकांत पाटील, भगवान पाटील, योगेश पाटील, प्रकाश पाटील, भगवान पाटील,विजय पाटील, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *