टेंट हाऊस , लायटिंग डेकोरेटर्स आणि केटरर्स युनियनची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनामुळे मंडप ,मंगल कार्यालय आणि त्यांच्याशी निगडीत व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने कोणत्याही समारंभात क्षमतेच्या ५० टक्के व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रमाची परवानगी द्यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन अमळनेर टेंट हाऊस , लायटिंग डेकोरेटर्स आणि केटरर्स युनियनने प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना दिले.
प्रातांधिकारी सीमा अहिरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे टेंट, मंडप, मंगल कार्यालय, हॉल, लॉन्स इव्हेंट मॅनेजमेंट, साऊंड लाईट डेकोरेशन या व्यवसायाशी संबंधित सर्वांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने आता त्यांचा जीएसटी १८ टक्के ऐवजी ५ टक्के करावा, वधू वर पित्याला जीएसटी परत मिळावा, व्यवसाय कर्जावर सबसिडी मिळावी आदी मागण्यांचे निवेदन अध्यक्ष प्रवीण बडगुजर, सचिव संजय एकतारे, सुनील जोशी, बी. बी. जैन, राजेंद्र पाटील, विलास पाटील, शाम राणे, गणेश बारी, राजेंद्र शेटे, हरीश भाटे, सुनील चौधरी, अमृत पाटील, जाकीरखा पठाण, विजय पाटील, तुळशीराम हटकर, निलेश महाजन, भालचंद्र बारी, शेखर नाथबुवा, नितीन महाजन, वैभव चौधरी, अमोल पवार, सुशील जैन, अरुण माळी, हमीद पठाण, सुखदेव चौधरी यांनी दिले. निवेदावर त्यांच्या सह्या आहेत.