आधार संस्था व लायनेस क्लबतर्फे युवतींना केले आरोग्यावर मार्गदर्शन  

अमळनेर (प्रतिनिधी) लायन्स क्लब व आधार संस्थेतर्फे ताडेपुरा भागात युवतींकरिता आरोग्य सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.या सभेस युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सभेत लायनेस क्लबच्या जेस्मिन भरूचा आरोग्य प्रकल्प कार्यक्रम प्रमुख व अमळनेर क्लबच्या सेक्रेटरी शारदा अग्रवाल, आधार संस्थेच्या भारती पाटील, रेणू प्रसाद, अश्विनी भदाणे , वैशाली शिंगाने  व वैशाली वानखेडे या उपस्थित होत्या.  सभेत जास्मिनजी भरूचा यांनी व्यक्तीमत्व विकास तर भारती पाटील यांनी स्त्रियांच्या आयुष्यातील मासिक पाळीह्या विषयांवर संवाद साधला. उपस्थित मुलींना लायनेस क्लबच्या वतीने सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ताडेपुरा भागातील आरोग्य मित्र दीपिका सपकाळे व मनीषा धनगर यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *