अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागात सोमवारी एकही रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला नाही. त्यामुळे सोमवार हा अमळनेरकरांसाठी मोठा दिलासा देणारा ठरला तर प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला.
अमळनेर तालुक्यात सुरुवातीपासून कोरोनाने कहर केला आहे. आतापर्यंत ४४३६पर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ४३१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १९ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून सोमवारी २ रुग्णांनी पुन्हा कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत १०३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.