खेडी व्यवहारदळे येथे उत्तरकार्याचा शिळा भात खाने पडले महागात

तब्बल २२ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ

अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथे उत्तरकार्याचा शिळा भात खाल्याने तब्बल २२ जणांना विषबाधा झाल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी घडली. यामुळे ग्रामस्थांसह आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर  तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथे ३१ ऑक्टोबर रोजी  उत्तरकार्याचा कार्यक्रम होता. यासाठी नातेवाईक वेगवेगळ्या गावाहून आले होते. त्यांसाठी जेवणाला भात करण्यात आला होता. भात उरल्यानन्तर रात्री देखील तोच भात खाल्ला आणि उरला म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तोच भात गरम करून खाल्ल्याने एकाचवेळी १ रोजी दुपारी उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. हाच त्रास प्रत्येकाला होऊ लागल्याने एकच धावपळ उडाली होती. त्यामुळे या सर्वांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. सर्वाना दाखल करून घेत डॉ. जी. एम. पाटील यांनी तातडीने उपचार सुरू केले. वेळेवर आणल्याने २ रोजी त्यांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले. हेडकॉन्स्टेबल भरत ईशी यांनी पंचनामा करून माहिती जाणून घेतली.

यांना झाली भातातून विषबाधा

उत्तरकार्यास आलेले खेडीचे नंदिनी सीताराम ठाकरे, मीराबाई रमेश भिल, शांताराम रमेश भिल , परशुराम रमेश भिल , तिरोनाबाई राजेश भिल , श्रीराम रमेश ठाकरे, जानकिराम रमेश ठाकरे , रेणुका परशुराम भिल , शिवदास तुकाराम भिल , सीताराम रमेश ठाकरे , चौबारी येथील सुरेखाबाई समाधान भिल , साई समाधान भिल , रुबजीनगर येथील पुना तुकाराम भिल, सुवरणाबाई तुकाराम भिल, प्रवीण तुकाराम भिल , कोयल तुकाराम  भिल, नेहा धनराज भिल, ढेकू येथील धनराज उखा भिल, नेहा धनराज भिल यांना विषबाधा झाली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *